OnePlus आपला नवीन 15T स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. हाच फोन भारतात OnePlus 15S नावाने येऊ शकतो. यात 6.32-इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट आणि 100W फास्ट चार्जिंगसह 7500mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

बीजिंग: OnePlus आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 15T लवकरच लाँच करणार आहे. हा फोन सर्वात आधी चीनमध्ये आणि त्यानंतर ग्लोबल मार्केटसह भारतात लाँच केला जाईल. भारतात हा फोन OnePlus 15S या नावाने येण्याची शक्यता आहे. याआधी OnePlus 13T हा फोन भारतात OnePlus 13S नावाने सादर करण्यात आला होता. दरम्यान, OnePlus 15T स्मार्टफोनचे काही फीचर्स आता समोर आले आहेत.

OnePlus 15T: कंपनीनेच दिली फीचर्सची माहिती

OnePlus चीनचे अध्यक्ष यांनी Weibo वर कन्फर्म केलं आहे की, OnePlus 15T मध्ये 6.32-इंचाचा फ्लॅट डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले OnePlus 13T सारखाच आहे. याशिवाय, फोनमध्ये अपग्रेडेड 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि मॅग्नेटिक ॲक्सेसरी सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 15T मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 (Snapdragon 8 Elite Gen 5) हा चिपसेट दिला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, यात 7500mAh ची मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी 100W वायर्ड फास्ट-चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. असंही म्हटलं जातंय की OnePlus 15T ला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग्स मिळाल्या आहेत.

भारतात OnePlus 15S नावाने येणार

रिपोर्ट्सनुसार, OnePlus 15T स्मार्टफोन भारतात OnePlus 15S या नावाने दाखल होईल. भारतातील मॉडेलमध्ये चायनीज व्हेरिएंटच्या तुलनेत फार मोठे बदल नसतील, अशी शक्यता आहे.