Old is gold : ॲपलने 2010 मध्ये लाँच केलेला आयफोन 4 ही एक प्रतिष्ठिची बाब समजली जात असे. या स्मार्टफोन मॉडेलमध्ये ग्लास आणि स्टीलच वापर करण्यात आला होता. या फोनची रिसेल व्हॅल्यू 9 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊया वास्तव.
(Old is gold)कॅलिफोर्निया : आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो. त्यामुळे जागोजागी मोबाइल शॉपी पाहायला मिळतात. मार्केटमध्ये एवढ्या कंपन्यांचे मोबाइल उपलब्ध आहेत की, सर्व थरातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून लाँच करण्यात आले आहेत. तरी काही मोठे ब्रॅण्ड मार्केटमधील आपले स्टेट्स सांभाळून आहेत. त्यात एक नंबरवर आहे, ती ॲपल कंपनी. या कंपनीच्या आयफोनची फीचर्स वैशिष्टपूर्ण असल्याने ते महाग असले तरी, त्याला चांगली मागणी आहे. पण आता एका मॉडेलची रिसेल व्हॅल्यू लाखाच्या घरात असल्याचे समोर आले आहे.
16 वर्षांपूर्वी ॲपलने लाँच केलेल्या आयफोन 4 ची सध्या ऑनलाइन रिसेल वेबसाइट्सवर सांगितली जाणारी किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 2010 मध्ये सादर झालेल्या आयफोन 4 साठी आता ऑनलाइन विक्री केंद्रांवर 9 लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे. आयफोन 4 ची किंमत इतकी वाढण्यामागचे कारण काय?
अमेरिकेतील रिसेल मार्केटमध्ये आयफोन 4 साठी सध्या दहा हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 लाख रुपयांपर्यंतची किंमत सांगितली जात आहे. 2010 मध्ये ॲपलने लाँच केलेला आयफोन 4 हे एक प्रतिष्ठित स्मार्टफोन मॉडेल आहे. ग्लास आणि स्टीलचे डिझाइन असलेल्या आयफोन 4 मध्ये रेटिना डिस्प्ले, फ्रंट-फेसिंग कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) यांसारखी वैशिष्ट्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. ॲपलचा आयफोनचा प्रवास आयफोन 4 पासून आज खूप पुढे गेला आहे. या AI च्या युगात, नवीन आयफोनमध्ये ॲपल इंटेलिजन्स आणि अधिक प्रगत प्रोसेसर व कॅमेरे आहेत. तरीही, आयफोन 4 ला आता इतकी मागणी का आहे?
आयफोन 4 ची मागणी वाढण्याचे कारण
'नॉस्टॅल्जिया' हा एकच शब्द आयफोन 4 च्या लाँचिंगनंतर 16 वर्षांनी इतकी मागणी वाढण्याचे कारण असल्याचे आयफोनप्रेमी आणि रिसेल विक्रेते सांगतात. आयफोन 4 हा ग्राहक तंत्रज्ञानाच्या एका वेगळ्या युगाचे प्रतीक आहे. सततच्या नोटिफिकेशन्स आणि अल्गोरिदम-आधारित ॲप्सच्या पूर्वीच्या काळातील हा हँडसेट असल्याने, नवीन पिढीसाठी तो एक मोठे कुतूहल आहे. तर जुन्या पिढीसाठी, आयफोन स्मार्टफोन क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील एक अविस्मरणीय आठवण आहे.
आयफोन 4 ची मागणी अचानक वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची दुर्मिळता. अनेक आयफोन 4 युनिट्स आधीच खूप वापरले गेले आहेत आणि खराब झाले आहेत किंवा टाकून दिले आहेत. सीलबंद किंवा अजूनही वापरण्यायोग्य स्थितीत असलेले आयफोन 4 हँडसेट आता दुर्मिळ झाले आहेत. जेव्हा संग्राहकांचा एक छोटा गटही ते खरेदी करण्यासाठी स्पर्धा करतो, तेव्हा साहजिकच आयफोन 4 ची किंमत वाढते. मूळ आयफोन व्यतिरिक्त, सुरुवातीच्या काळातील आयपॉड आणि न उघडलेले व्हिडिओ गेम कन्सोल यांच्या किमतीतही अलिकडच्या वर्षांत अशीच वाढ झाल्याचे वृत्त आहे.
तथापि, ऑनलाइन रिसेल केंद्रांवर सध्या दिसणाऱ्या सर्व लिस्टिंग खऱ्या विक्री किमती दर्शवत नाहीत, असेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दहा हजार डॉलर्स ही आयफोन 4 ची विक्री झालेली किंमत नसून, विक्री केंद्रांवर मागितलेली किंमत आहे, असा दावा करणारेही आहेत. बाजारात उत्साह निर्माण करण्यासाठी ही फुगवलेली किंमत असल्याचा संशयही बळावला आहे.


