New Year 2026: रांगोळ्यांची काही सोपी आणि सुंदर डिझाइन्स खास तुमच्यासाठी
New Year 2026: नवीन वर्षात 'हॅपी न्यू इयर' रांगोळीच्या शोधात आहात का? येथे आम्ही काही रांगोळी डिझाइन्स दिल्या आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या अगदी योग्य रांगोळ्या आहेत. मग उशीर कशाला, यापैकी एक शिकून आजच काढा अणि आपल्या घरासमोरची जागा सजवा.
14

Image Credit : Rang Kaa Rangoli/Youtube
हॅपी न्यू इयर रांगोळी
रांगोळीमध्येच 'हॅपी न्यू इयर' असे लिहायचे असेल, तर ही रांगोळी तुमच्यासाठी योग्य आहे. इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी असलेल्या या रांगोळीत संदेशही दडलेला आहे.
24
Image Credit : Rang Kaa Rangoli/Youtube
मोराची रांगोळी
रांगोळ्यांमध्ये मोराच्या रांगोळीला खूप महत्त्व आहे. मोराच्या पिसाऱ्याचे रंग खूपच सुंदर दिसतात. तुम्हाला ही रांगोळी आवडल्यास नक्की शिकून घ्या.
34
Image Credit : Tej rangoli/Youtube
कमळाची रांगोळी
मध्ये कमळ आणि सभोवताली फुले व पानांनी काढलेली ही रांगोळी खूप आकर्षक दिसते. ठिपक्यांशिवाय अगदी सोप्या पद्धतीने काढता येते.
44
Image Credit : Tej rangoli/Youtube
सोप्या पद्धतीने काढण्यासाठी
ज्यांना मोठ्या रांगोळ्या काढता येत नाहीत, ते ही सोपी रांगोळी निवडू शकतात. यात 'हॅपी न्यू इयर' असे लिहिलेले असल्यामुळे, वेगळा संदेश लिहिण्याची गरज नाही.

