New Privacy Feature: सॅमसंग गॅलेक्सी वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हसी संरक्षण प्रणाली सादर करत आहे. सार्वजनिक ठिकाणी इतरांना फोनच्या स्क्रीनवर डोकावण्यापासून ('शोल्डर सर्फिंग') रोखणे हा याचा उद्देश आहे.

New Privacy Feature: कोची - गोपनीयता (Human Privacy) म्हणजे स्वतःची खाजगी माहिती, विचार, शरीर आणि वैयक्तिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा आणि इतरांच्या विनाकारण हस्तक्षेप किंवा पाळत ठेवण्यापासून मुक्त राहण्याचा मूलभूत अधिकार आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार (Right to Privacy) हा कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्क मानला आहे, जो डिजिटल युगातही अत्यंत महत्त्वाचा आहे. हल्लीच्या काळात सायबर गुन्हे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी गोपनीयता पाळली जावी. 

सॅमसंग गॅलेक्सी वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हसी संरक्षण प्रणाली सादर करण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोन ही आपली सर्वात खासगी जागा असली तरी, आपण ती सार्वजनिक ठिकाणीच जास्त वापरतो. बस, लिफ्ट किंवा रांगेत उभे असताना इतरांच्या नजरा आपल्या फोनच्या स्क्रीनवर पडतात, ज्यामुळे जगभरात प्रायव्हसीची चिंता वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सॅमसंगने गॅलेक्सी फोन वापरकर्त्यांसाठी ही नवीन प्रणाली आणली आहे.

सॅमसंगचे नवीन तंत्रज्ञान

स्मार्टफोनवरील मेसेज तपासताना किंवा पासवर्ड टाकताना 'शोल्डर सर्फिंग' टाळण्यास मदत करणारी ही नवीन लेअर, वापरकर्त्याला आवश्यकतेनुसार प्रायव्हसी निवडण्याची संधी देईल. विशिष्ट ॲप्स आणि नोटिफिकेशन पॉप-अप्सनाही संरक्षण देण्यासाठी हे कस्टमाइझ करता येईल. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या संशोधन आणि चाचण्यांनंतर हे तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे सॅमसंगने सांगितले. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे मिश्रण असलेली ही प्रणाली, वापरकर्त्याला त्रास न देता सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केली आहे.

Samsung Knox सारख्या मजबूत सुरक्षा प्रणालींवर आधारित हे नवीन फीचर 'पिक्सल-लेव्हल' प्रायव्हसी देण्याचे वचन देते. गॅलेक्सी डिव्हाइसेसवर मोबाइल प्रायव्हसीसाठी नवीन मापदंड स्थापित करणारी ही प्रणाली लवकरच सादर केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.