MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Tech Tips : तुम्ही खरेदी केलेला स्मार्टफोन खोटा तर नाही ना? या ट्रिक्स वापरुन करा व्हेरिफाय

Tech Tips : तुम्ही खरेदी केलेला स्मार्टफोन खोटा तर नाही ना? या ट्रिक्स वापरुन करा व्हेरिफाय

Tech Tips : स्मार्टफोन खरेदी करताना तो खरा आहे की खोटा, याची खात्री करणे गरजेचे आहे. IMEI नंबर, बॉक्स आणि पॅकेजिंग, सॉफ्टवेअर, कामगिरी आणि विक्रेत्याची विश्वासार्हता या गोष्टी तपासून तुम्ही फसवणूक टाळू शकता. 

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Dec 24 2025, 12:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
स्मार्टफोनसाठी टिप्स
Image Credit : Getty

स्मार्टफोनसाठी टिप्स

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन ही केवळ गरज नसून दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र वाढती मागणी पाहता बाजारात बनावट (Fake) किंवा रिफर्बिश्ड स्मार्टफोन नवीन म्हणून विकले जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. अनेक वेळा ग्राहक मोठी रक्कम खर्च करून फोन खरेदी करतो, पण नंतर तो फोन खोटा किंवा आधी वापरलेला असल्याचे समोर येते. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेला स्मार्टफोन खरा आहे की खोटा, याची खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा स्मार्टफोन ओरिजिनल आहे की नाही, हे सहज तपासू शकता.

26
IMEI नंबरद्वारे करा पडताळणी
Image Credit : Getty

IMEI नंबरद्वारे करा पडताळणी

स्मार्टफोन खरा आहे की खोटा, हे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे IMEI नंबर. प्रत्येक स्मार्टफोनला वेगळा 15 अंकी IMEI नंबर असतो. *#06# डायल केल्यावर स्क्रीनवर IMEI नंबर दिसतो. हा नंबर फोनच्या बॉक्सवर आणि बिलावर असलेल्या IMEI नंबरशी जुळतो का, ते तपासा. तसेच भारत सरकारच्या अधिकृत CEIR (Central Equipment Identity Register) वेबसाइटवर जाऊन हा IMEI नंबर टाकून फोनची वैधता तपासता येते. IMEI नंबर जुळत नसेल किंवा सिस्टिममध्ये नसेल, तर फोन खोटा किंवा संशयास्पद असू शकतो.

Related Articles

Related image1
Samsung Galaxy S25 Ultra वर तब्बल ६० हजारांची बचत! इतका स्वस्त कुठे मिळतोय हा प्रीमियम फोन?
Related image2
New smartphone : 9000mAh बॅटरीच्या क्षमतेचा नवा वनप्लस मोबाइल; जाणून घ्या फीचर्स
36
फोनच्या बॉक्स आणि पॅकेजिंगकडे लक्ष द्या
Image Credit : Getty

फोनच्या बॉक्स आणि पॅकेजिंगकडे लक्ष द्या

ओरिजिनल स्मार्टफोनच्या बॉक्सवर कंपनीचा लोगो, मॉडेल नंबर, बारकोड आणि सील नीट असते. बॉक्स फाटलेला, सील उघडलेली किंवा प्रिंटिंग अस्पष्ट असल्यास सावध व्हावे. अनेकदा बनावट फोनच्या बॉक्सवर स्पेलिंग चुका, हलकी प्रिंट क्वालिटी किंवा चुकीची माहिती दिलेली असते. तसेच बॉक्समध्ये मिळणारे चार्जर, केबल आणि इतर अ‍ॅक्सेसरीज ओरिजिनल ब्रँडच्या आहेत का, याचीही खात्री करा.

46
सॉफ्टवेअर आणि सेटिंग्स तपासा
Image Credit : Getty

सॉफ्टवेअर आणि सेटिंग्स तपासा

फोन ऑन केल्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन About Phone किंवा फोनबद्दल या पर्यायात मॉडेल नंबर, Android/iOS व्हर्जन आणि सिक्युरिटी अपडेट्स तपासा. अनेक खोट्या फोनमध्ये फेक इंटरफेस दिलेला असतो, जो पाहायला ओरिजिनलसारखा वाटतो पण प्रत्यक्षात कमी दर्जाचा असतो. गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर नीट चालते का, ब्रँडचे अधिकृत अ‍ॅप्स प्री-इन्स्टॉल आहेत का, हेही तपासणे महत्त्वाचे आहे.

56
कामगिरी आणि कॅमेरा
Image Credit : pexels

कामगिरी आणि कॅमेरा

क्वालिटीवर लक्ष ठेवा ओरिजिनल स्मार्टफोनची कामगिरी (Performance) सुरळीत असते. फोन वारंवार हँग होत असेल, अ‍ॅप्स उघडायला वेळ लागत असेल किंवा कॅमेरा क्वालिटी जाहिरातीत सांगितल्यापेक्षा खूपच कमी असेल, तर फोन बनावट किंवा रिफर्बिश्ड असण्याची शक्यता असते. तसेच बॅटरी लवकर संपत असल्यास किंवा फोन गरम होत असल्यासही शंका घ्यावी.

66
अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा
Image Credit : pexels

अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा

स्मार्टफोन खोटा निघू नये यासाठी अधिकृत शोरूम, कंपनीची वेबसाइट किंवा विश्वासार्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करणे सुरक्षित ठरते. खरेदी करताना पक्का बिल, वॉरंटी कार्ड आणि रिटर्न पॉलिसी यांची माहिती घ्या. अत्यंत कमी किमतीत मिळणाऱ्या ऑफर्सकडे आकर्षित होण्याआधी एकदा नक्की विचार करा, कारण अशा ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Travel : महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे आहेत मिनी गोवा, वर्षाअखेरीस नक्की भेट द्या
Recommended image2
2026 मध्ये अनेक संधी, या 5 नशीबवान राशींचे भाग्य उजळणार, होईल पैशांचा पाऊस!
Recommended image3
Horoscope 24 December : आज बुधवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांसाठी विवाहबाह्य संबंध त्रासाचे कारण बनेल!
Recommended image4
विंटेज+मॉडर्न चार्म! ट्राय करा अदिती राव हैदरीच्या 7 हेअरस्टाईल्स
Recommended image5
ख्रिसमस गिफ्टवर 80% पर्यंत सूट, 300 रुपयांत खरेदी करा 3 गिफ्ट्स
Related Stories
Recommended image1
Samsung Galaxy S25 Ultra वर तब्बल ६० हजारांची बचत! इतका स्वस्त कुठे मिळतोय हा प्रीमियम फोन?
Recommended image2
New smartphone : 9000mAh बॅटरीच्या क्षमतेचा नवा वनप्लस मोबाइल; जाणून घ्या फीचर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved