MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • New Rules: परत म्हणू नका सांगितलं नाही! १ एप्रिलपासून बदलणार घरभाड्याचे नियम; तुमची एक चूक पडेल महाग!

New Rules: परत म्हणू नका सांगितलं नाही! १ एप्रिलपासून बदलणार घरभाड्याचे नियम; तुमची एक चूक पडेल महाग!

New Rules: १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर नियमांनुसार, घरभाडे भत्ता (HRA) सवलतीसाठी आता केवळ भाडेपावती पुरेशी नाही. कर्मचाऱ्यांना आता 'फॉर्म १२४' द्वारे घरमालकाशी असलेले नाते उघड करणे बंधनकारक असेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 29 2026, 06:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
परत म्हणू नका सांगितलं नाही! १ एप्रिलपासून बदलणार घरभाड्याचे नियम
Image Credit : our own

परत म्हणू नका सांगितलं नाही! १ एप्रिलपासून बदलणार घरभाड्याचे नियम

मुंबई: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि टॅक्स वाचवण्यासाठी घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत, HRA सवलत मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता केवळ भाड्याची पावती देऊन चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या घरमालकाशी असलेले नातेही सरकारला सांगावे लागणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
काय आहे नवीन 'फॉर्म १२४'?
Image Credit : our own

काय आहे नवीन 'फॉर्म १२४'?

सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन नियमांनुसार, आता 'फॉर्म १२४' (Form 124) भरताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरमालकाची सविस्तर माहिती देणे बंधनकारक असेल. यामध्ये घरमालकाचे नाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे त्यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करावे लागेल. 

Related Articles

Related image1
Jamin Ferfar: मंजूर झालेला फेरफार रद्द होतो का? काय आहे कायदेशीर प्रक्रिया आणि '९० दिवसांचा' महत्त्वाचा नियम!
Related image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
36
खोट्या भाडेपावत्यांना बसणार चाप
Image Credit : Twitter

खोट्या भाडेपावत्यांना बसणार चाप

अनेक करदाते टॅक्स वाचवण्यासाठी आपल्या आई-वडिलांच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावाने खोट्या भाडेपावत्या सादर करतात. नवीन नियमांमुळे अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. नातेसंबंध उघड करणे अनिवार्य झाल्यामुळे, आयकर विभागाला अशा दाव्यांची पडताळणी करणे आता अधिक सोपे होणार आहे. 

46
नातेवाईकांना भाडे देताना 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit : Twitter

नातेवाईकांना भाडे देताना 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा

कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यावर कोणतीही बंदी नाही, परंतु नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

१. वैध भाडेकरार: घरमालक नातेवाईक असला तरीही रीतसर 'रेंट ॲग्रीमेंट' असणे गरजेचे आहे.

२. बँकिंग व्यवहार: भाड्याचे पैसे रोख (Cash) न देता शक्यतो बँक ट्रान्सफर किंवा चेकद्वारे द्या, जेणेकरून तुमच्याकडे व्यवहाराचा पुरावा असेल.

३. घरमालकाचा टॅक्स: तुम्ही दिलेले भाडे घरमालकाने (उदा. आई किंवा वडील) त्यांच्या आयकर विवरणपत्रात (ITR) 'उत्पन्न' म्हणून दाखवणे आवश्यक आहे. 

56
का करण्यात आला हा बदल?
Image Credit : Twitter

का करण्यात आला हा बदल?

कर तज्ज्ञांच्या मते, अनेक उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती करचोरीसाठी चुकीच्या मार्गाने HRA क्लेम करतात. नवीन ड्राफ्ट नियमांमुळे खऱ्या करदात्यांना त्रास होणार नाही, परंतु करचोरी करणाऱ्यांवर अंकुश बसेल. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : Twitter

महत्त्वाची टीप

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्या भाडे कराराची आणि कागदपत्रांची पूर्तता करून घ्या, जेणेकरून ऐनवेळी तुमची टॅक्स सवलत नाकारली जाणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold - Silver Rate Today : सोने-चांदीच्या किमतीत वाढ, किती आहे १० ग्रॅमसाठीचा आजचा दर?
Recommended image2
Silver Baby Earrings: चिमुकली कानातले 2 हजारांत पाहा, भारी डिझाइन्स
Recommended image3
Gold Exchange Offer: जुनं सोनं द्या, नवे दागिने घ्या! जुन्यालाही पूर्ण किंमत
Recommended image4
Anklet Designs: सोन्याची चमक देणाऱ्या चांदीच्या पैंजण, तुमचा लूकच बदलेल!
Recommended image5
9KT Gold Earrings: 10 हजारांच्या आत सोनेरी स्टड्स, 6 ट्रेंडी डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Jamin Ferfar: मंजूर झालेला फेरफार रद्द होतो का? काय आहे कायदेशीर प्रक्रिया आणि '९० दिवसांचा' महत्त्वाचा नियम!
Recommended image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved