लैंगिक संबंधानंतर महिलांनी 'या' ३ गोष्टी कधीच करू नये, महत्त्वाची माहिती
लैंगिक संबंधावेळी बॅक्टेरिया मूत्राशयात ढकलले जातात, ज्यामुळे नंतर मूत्राशय संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

शारीरिक संबंध -
एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी शारीरिक संबंधानंतर अनेकजण करत असलेल्या आरोग्यासाठी हानिकारक गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. तज्ज्ञांच्या मते, महिलांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टचे आरोग्य जपण्यासाठी शारीरिक संबंधानंतर काही गोष्टी करू नयेत.
साबणाचा वापर -
अनेक महिला लैंगिक संबंधानंतर स्वच्छतेबाबत खूप जागरूक असतात. त्यांनी योनी स्वच्छ करताना साबण वापरू नये. साबणातील रसायनांमुळे योनीमध्ये जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. योनी हा एक स्वयं-स्वच्छ आणि संवेदनशील अवयव आहे.
शौचालयाला न जाणे -
लैंगिक संबंधावेळी बॅक्टेरिया मूत्राशयात ढकलले जातात, ज्यामुळे मूत्राशय संसर्गाचा धोका वाढतो. ही समस्या टाळण्यासाठी, संबंधानंतर लगेच शौचालयाला जायला विसरू नका. यामुळे मूत्राशयातील बॅक्टेरिया लघवीसोबत बाहेर पडतात आणि संसर्ग टळतो.
रेयॉन किंवा पॉलिस्टर अंतर्वस्त्रात झोपणे -
बहुतेक अंतर्वस्त्रे रेयॉन किंवा पॉलिस्टरची बनलेली असतात. संबंधानंतर शरीरातील उष्णता आणि ओलावा आत अडकून राहतो, ज्यामुळे यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. अशावेळी, स्वच्छ सुती अंतर्वस्त्रे घालणे उत्तम.

