सार
प्रत्येक वर्षानुसार 2024 मध्येही राष्ट्रीय परीक्षा एजेंसीद्वारे वैद्यकीय विभागाच्या रिक्त जागांवर नोकर भरतीच्या कारणास्तव नीट यूजीची परीक्षा घेतली जाते. अशातच आता नीट यूजी परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
NEET 2024 Answer Key and Results Date : नॅशनल टेस्टिंग एजेंसीने नीट यूजी 2024 परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका जारी केली आहे. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जाऊन उत्तरपत्रिका पाहण्यासह डाउनलोड करता येणार आहे. याशिवाय उत्तर पत्रिकेसंबंधित काही समस्या असल्यास येत्या 31 मे पर्यंत हरकती नोंदवता येणार आहे. जाणून घेऊया अखेरची उत्तर पत्रिका आणि निकाल कधी जाहीर केला जाणार याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.…
दरम्यान, उत्तरपत्रिकेसंदर्भात काही समस्या असल्यास त्याबद्दलचा अर्ज 31 मे रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न 200 रुपये फी द्यावी लागणार आहे.
NEET UG 2024 Answer Key अशी तपासून पाहा
- एनटीएची अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET येथे भेट द्या.
- होम पेजवर देण्यात आलेल्या NEET UG Answer Key 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता विचारण्यात आलेली माहिती द्यावी लागेल.
- उत्तरे तुम्हाला स्क्रिनवर दिसतील.
यंदाच्या नीट यूजी परीक्षेत जवळजवळ 24 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. परीक्षेचे आयोजन देशभरातील नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते.
कधी येणार निकाल?
नीट यूजी परीक्षेचा निकाल जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. याशिवाय एससी/एसटी/ओबीसी श्रेणीतील विद्यार्थ्यांना कमीतकमी 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षात प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका 4 जूनला जारी करण्यात आली होती. परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार नीट यूजी 2024 चा निकाल येत्या 14 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.
किती गुणांची होती परीक्षा?
परीक्षा एकूण 720 गुणांची होती. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजीच्या विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेचे आयोजन देशभरातील 557 शहरांमध्ये आणि देशाबाहेर 14 शहरांमधील 4750 परीक्षा केंद्रावर करण्यात आले होते.
आणखी वाचा :
घरात किती रक्कम ठेवू शकता? अन्यथा पडाल समस्येत, वाचा Income Tax चा नियम
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची संधी