सार

बहुतांशवेळा बातम्यांमध्ये दाखवले जाते की, नोकरदार, अधिकारी अथवा व्यावसायिकंच्या घरावर इन्कम टॅक्सकडून छापा टाकला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त केली जाते. अशातच घरात किती रक्कम ठेवण्यावर मर्यादा आहे हे माहितेय का?

Income Tax Rule : देशात सध्या डिजिटल पद्धतीनेच सर्व व्यवहार केले जातात. अशातच नागरिक पाकिटांमध्ये अत्याधिक रोख रक्कम ठेवण्याएवजी युपीआय (UPI) अथवा क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर पेमेंटसाठी करतात. पण अद्याप काहीजण एटीएम (ATM) अथवा बँक खात्यातून पैसे काढत मोठ्या रक्कमेचे ट्रांजेक्शन करतात. अशातच घरात किती रक्कम ठेवू शकता आणि याची मर्यादा किती याबद्दल माहितेय का?

दरम्यान, इन्कम टॅक्स विभागाकडून घरात रक्कम ठेवण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. पण काही नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्ही समस्येत अडकू शकता. अथवा तुरुंगातही जावे लागू शकते.

घरात किती रक्कम असावी?
आयकर विभागाने घरात रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा ठरविलेली नाही. तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम घरात ठेवू शकता आणि ट्रांजेक्शनही करू शकता. याच संदर्भातील एक चूक तुम्हाला भारी पडू शकते. अशातच तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते.

या समस्येचा करावा लागू शकतो सामना
बहुतांश बातम्यांमध्ये पाहतो की, नोकरदार, व्यावसायिक अथवा अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली आहे. खरंतर, ही रक्कम अनधिकृत असते. आयकर विभागाकडून अनधिकृत रक्कम जमा केली जाते. याशिवाय त्यासंबंधित व्यक्तीलाही अटक होते. एकूणच आयकर विभागाकडून अशावेळी कारवाई केली जाते जेव्हा रक्कम कोठून आली, ती येण्याचा मार्ग काय याची माहिती पूर्णपणे मिळत नाही. यामुळे रोख रक्कम घरात ठेवणार असल्यास त्याचे इन्कम ऑफ सोर्स (Income Of Source) काय आहे याची महिती तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे.

अधिक रक्कम मिळाल्यास पॅन कार्ड द्यावे लागेल
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सच्या नियमानुसार, एकावेळी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेतून काढल्यास व्यक्तीला पॅन कार्ड दाखवावे लागते. एका वर्षात बँक खात्यातून 20 लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली जाऊ शकत नाही. एकाच वेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यासही पॅन कार्ड दाखवावे लागते. पण चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले नसल्यास घाबरण्याची गरज नाही.

आणखी वाचा : 

HDFC बँकेचा मोठा निर्णय, UPI पेमेंटसाठी येणार नाही मेसेज, वाचा संपूर्ण माहिती सविस्तर

WhatsApp अकाउंट चुकून ब्लॉक झालेय? Unblock करण्याची सोपी ट्रिक घ्या जाणून स्टेप बाय स्टेप