MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • LPG Cylinder New Rules: गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल; तुमच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर काय होणार परिणाम?

LPG Cylinder New Rules: गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल; तुमच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर काय होणार परिणाम?

LPG Cylinder New Rules: केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल केलेत, ज्यात दरात ७% वाढ, बुकिंगच्या नियमांत बदल, पीएनजी ग्राहकांसाठी कठोर नियम यांचा समावेश आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र ३०० अनुदान कायम ठेवण्यात आले आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 04:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल
Image Credit : X

गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल

मुंबई: जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता तुमच्या घराच्या बजेटवर होणार आहे. इराण-इस्रायल तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून केंद्र सरकारने एलपीजी (LPG) सिलेंडरच्या संदर्भात ५ अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सामान्य गृहिणींपासून ते उज्ज्वला लाभार्थ्यांपर्यंत, प्रत्येकासाठी हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. 

27
१. खिशाला झळ: सिलेंडरच्या दरात ७% वाढ
Image Credit : X

१. खिशाला झळ: सिलेंडरच्या दरात ७% वाढ

७ मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोचा सिलेंडर आता ९६५ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तब्बल एका वर्षानंतर झालेली ही दरवाढ मध्यमवर्गीयांचे मासिक गणित बिघडवणारी ठरली आहे. 

Related Articles

Related image1
LPG Complaint: गॅस सिलेंडर बुक केलाय पण डिलिव्हरी मिळेना? नेमकं काय करायला हवं?
Related image2
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
37
२. दोन सिलेंडरमधील 'गॅप' वाढला (बुकिंगचा नवा नियम)
Image Credit : Asianet News

२. दोन सिलेंडरमधील 'गॅप' वाढला (बुकिंगचा नवा नियम)

गॅसचा गैरवापर टाळण्यासाठी बुकिंगच्या नियमात मोठा फेरबदल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात: आता एकदा सिलेंडर घेतल्यावर पुढील ४५ दिवसांनंतरच दुसरे बुकिंग करता येईल.

शहरी भागात: ही मर्यादा २५ दिवसांची ठेवण्यात आली आहे.

मर्यादा: एका कुटुंबाला वर्षाला जास्तीत जास्त १५ सिलेंडर मिळतील, त्यापैकी १२ सिलेंडरवर सबसिडी (अनुदान) लागू असेल. 

47
३. उज्ज्वला लाभार्थ्यांना 'दिलासा' कायम
Image Credit : X

३. उज्ज्वला लाभार्थ्यांना 'दिलासा' कायम

वाढत्या महागाईत उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना केंद्राने मोठा आधार दिला आहे. या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान कायम मिळणार असून, त्यांना सिलेंडर साधारण ५५० रुपयांत पडणार आहे. यात SC/ST, अंत्योदय आणि अति मागासवर्गीय कुटुंबांचा समावेश आहे. 

57
४. PNG असेल तर LPG ला 'नो एन्ट्री'
Image Credit : X

४. PNG असेल तर LPG ला 'नो एन्ट्री'

ज्यांच्या घरात पाईपलाईन गॅस (PNG) आहे, त्यांच्यासाठी नियम कडक झाले आहेत. अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडर घेता येणार नाही किंवा जुना रिफिल करता येणार नाही. गॅस कंपन्यांनी पीएनजी ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन स्वेच्छेने सरेंडर करण्याचे आवाहन केले आहे. 

67
५. आयातीचे संकट आणि नवीन पर्याय
Image Credit : X

५. आयातीचे संकट आणि नवीन पर्याय

भारताला ९०% गॅस आयात करावा लागतो. सध्या 'स्ट्रोट ऑफ हॉर्मुज'मधील तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावर उपाय म्हणून भारताने रशिया, अमेरिका, नॉर्वे आणि कॅनडाकडून गॅस घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशांतर्गत उत्पादन २८ टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे.

77
'गॅस जपून वापरणे' हाच सर्वसामान्यांसाठी उत्तम मार्ग
Image Credit : ANI

'गॅस जपून वापरणे' हाच सर्वसामान्यांसाठी उत्तम मार्ग

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता 'गॅस जपून वापरणे' हाच सर्वसामान्यांसाठी उत्तम मार्ग आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Leaf Fertilizer: कचरा समजू नका, पानगळीची सुकी पानं आहेत 'काळं सोनं'! बागकामात असा करा वापर
Recommended image2
Onion Peel : कांद्याची साल कचऱ्यात फेकताय? थांबा! तिचे हे फायदे वाचून थक्क व्हाल!
Recommended image3
Plant Care: नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप ४ दिवसांतच सुकतंय? माळ्याने सांगितल्या या ५ मोठ्या चुका
Recommended image4
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
Recommended image5
तुमच्या घराच्या भिंती बोलक्या करा! फोटो फ्रेम लावण्याच्या ५ ट्रेंडी आयडिया
Related Stories
Recommended image1
LPG Complaint: गॅस सिलेंडर बुक केलाय पण डिलिव्हरी मिळेना? नेमकं काय करायला हवं?
Recommended image2
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved