सार
नावानं सुचवल्याप्रमाणे, ते अनेक आर्टिफिशियल इंटेलिजेंट वैशिष्ट्यांना सपोर्ट करतील.
प्रसिद्ध लॅपटॉप ब्रँड लेनोव्हो त्यांचे लॅपटॉप पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत आहे. एआय फीचर्सवर चालणारे अग्रणी शाओक्सिन प्रो (Xiaoxin Pro 14/16 GT AI 2025) लॅपटॉप मॉडेल सादर करण्यासाठी कंपनी सज्ज होत आहे. १८ फेब्रुवारी रोजी हे चीनमध्ये लाँच केले जातील असे नवीन रिपोर्ट्स सांगतात. हे लॅपटॉप मॉडेल स्लिम आणि हलक्या डिझाइनसह येतील. नावानं सुचवल्याप्रमाणे, ते अनेक आर्टिफिशियल इंटेलिजेंट वैशिष्ट्यांना सपोर्ट करतील.
या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेलचे नवीनतम कोर अल्ट्रा ७ २५५H, अल्ट्रा ९ २८५H प्रोसेसर ३२GB ड्युअल-चॅनल LPDDR5x-8533 मेमरीसह सुसज्ज आहेत. यात ड्युअल PCIe 4.0 ड्राइव्ह बे (M.2 2242+2280) आहेत. तसेच १TB स्टोरेजसह प्री-इंस्टॉल केलेले आहे.
नवीन लॅपटॉपला १६ इंच २.८K OLED डिस्प्ले मिळेल. हे व्यावसायिक आणि मनोरंजन गरजांसाठी योग्य असलेले जीवंत व्हिज्युअल्स सुनिश्चित करते असे कंपनी म्हणते. ८४Wh बॅटरी, ड्युअल २W स्पीकर्स, ड्युअल थंडरबोल्ट ४, ड्युअल यूएसबी - ए, एचडीएमआय २.१, एसडी कार्ड रीडर, ३.५ एमएम हेडफोन जॅक ही लॅपटॉपची इतर प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शाओक्सिन प्रो १६ GT वाय-फाय ७ ला सपोर्ट करते. तसेच चांगल्या सुरक्षेसाठी प्रायव्हसी शटर आणि ToF (ToF0) सेन्सरसह फुल एचडी इन्फ्रारेड कॅमेरा देखील आहे.
अलिकडेच, लेनोव्होने चीनमध्ये इरेझर एस१३० (Erazer S130 2-in-1) टॅब्लेट देखील लाँच केले होते. यात १३ इंच ३K IPS टचस्क्रीन, इंटेल सेलेरॉन N100 प्रोसेसर, १६GB पर्यंत DDR5 रॅम, ५१२GB SSD स्टोरेज समाविष्ट आहे. तसेच विंडोज ११ टॅब्लेटमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहे.