Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून आतापर्यंत तब्बल ८० लाख महिलांना अपात्र घोषित करत या योजनेतून वगळण्यात आलं आहे. 

मुंबई : लाडकी बहीण योजना सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीकोनातून सुरु केली आहे. पण काही महिला या योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत, तरी देखील त्या या योजनेत लाभ घेत होत्या, अशा ८० लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. मात्र ज्या महिला पात्र आहेत, पण त्यांनी केवाआयसी न केल्याने त्या वगळल्या गेल्या आहेत, अशा सर्व महिलांना देखील केवायसी करण्याची संधी आहे. बोगस लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने योजनेवरील खर्चात मोठी मदत झाली आहे, यामुळे यापुढे लाडक्या बहिणीचे पैसे वेळेवर मिळण्यात मदत होईल, असं बोललं जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

३००० रुपये खात्यात येणार?

मात्र तरी देखील काही महिलांना दरमहा मिळणारे १५०० रुपये अजून खात्यात, वेळेवर जमा झालेले नाहीत. तर जून २०२६ आणि जुलै २०२६ असे २ महिन्याचे मिळून एकूण ३ हजार रुपये या महिन्यात खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून याबाबतीत अजूनही काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या योजनेत मागील २ महिन्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न कऱण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नकली तसंच योजनेत न बसणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीय.

सत्ताधारींवर आरोप पण

आश्चर्याची बाब म्हणजे काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्यात येणार आहे. मात्र ज्या महिला लाभार्थीच्या निकषात बसणार नव्हत्या, पण त्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला, त्यांना मात्र कारवाईतून वगळण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजना आल्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत येण्यास मदत झाल्याचं आज राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं आहे.

पैसे आले नाहीत तक्रार कुठे करायची

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, जर पैसे आले नाहीत तर कुणाला सांगायचं, लाडकी बहीण योजनेची तक्रार कुठे करायची, याविषयी अनेक प्रश्न महिला लाभार्थींना पडले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे दर महिन्याला एका ठरवाविक तारखेला देण्यात येतील, असं राज्य सरकारकडून अजून तरी जाहीर करण्यात आलेले नाही. म्हणून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येतील, असा प्रश्न महिलांना पडतो आहे.

पैसे येण्याची तारीख ठरेल का

लाडकी बहीण योजनेचे पैसे एका ठराविक तारखेला दर महिन्याला आले, तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मानसिक त्रास नक्कीच कमी होणार आहे. तसंच ज्यांना पैसे आले नाहीत, त्यांना लवकरच तक्रार करता येणार आहे की, पैसे अजून का आलेले नाहीत.