महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विमा सखी योजना २०२५ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना घरबसल्या व्यवसाय करण्याची संधी मिळणार असून पहिल्या वर्षी दरमहा ७००० रुपये मानधन दिले जाईल. 

लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील सरकार दर महिन्याला १५०० रुपये मदत करत असते. आता त्यांना घरबसल्या ७००० रुपये मिळणार आहेत. ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुखाची बातमी घेऊन आली आहे. विमा सखी योजेनच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात .

विमा सखी योजनेची माहिती जाणून घेऊयात 

विमा सखी योजनेची आपण आता माहिती जाणून घेऊयात. भीमा सखी योजना २०२५ ही योजना सरकारच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना एलआयसी योजनेसारखी काम करत असून महिला या माध्यमातून पैसे कमवू शकणार आहेत.

योजनेचे फायदे आणि मानधन जाणून घ्या 

पहिल्या वर्षी महिलांना महिन्याला ७००० रुपये मिळणार असून वर्षाला ८४००० रुपये मिळणार आहेत. महिलांना या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार असून घरबसल्या व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ६००० रुपये मिळणार असून वर्षाला ७२,००० महिलांना मिळणार आहे. तिसऱ्या वर्षी ५००० रुपये मिळणार असून वर्षाला ६०००० रुपये मिळणार आहेत.

वर्षाच्या शेवटी बोनस मिळणार 

वर्षाच्या शेवटी महिलांना बोनस मिळणार आहे. या मानधनासोबतच जर तुम्ही LIC एजंट म्हणून उत्तम काम केले, तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी ४८,००० रुपयांपर्यंतचा बोनस देखील मिळू शकतो. योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. महिलांना या माध्यमातून रोजगार मिळणार असून बेरोजगारी कमी होणार आहे.

योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत? 

  • अर्ज करणारी व्यक्ती फक्त महिला असावी. 
  • अर्जदाराने किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असावे. 
  • १८ ते ७० वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 
  • तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पात्र महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतील.