IND vs PAK Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.  

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. सुपर फोरच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला 11 धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. या 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः गोलंदाजीत पाकच्या गोलंदाजांनी धमाकेदार खेळ दाखवला. या आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी ग्रुप स्टेज आणि सुपर फोर फेरीत दोन्ही संघ भिडले होते.

भारताचे लक्ष आशिया कपच्या नवव्या विजेतेपदावर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना अत्यंत रोमांचक होणार आहे. एकीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाचे लक्ष पाकिस्तानला या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पराभूत करण्यावर असेल, तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचा बदला घेऊन आशिया कपचा ताज आपल्या डोक्यावर सजवू इच्छितो. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने केवळ 2 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

भारत-पाकिस्तान आशिया कप हेड-टू-हेड आकडेवारी

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिल्यास, आतापर्यंत टी-२० मध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ५ सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारतीय संघाने ४ जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त १ सामना जिंकला आहे. २०१६ च्या आशिया कप टी-२० मध्ये भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने हरवले होते, त्यानंतर आशिया कप टी-२० २०२२ मध्ये भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवले आणि नंतर पाकिस्तानने भारताला ५ विकेट्सने हरवले. यावेळी भारतीय संघ २ सामने जिंकला असून तिसऱ्यावर नजर आहे.

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानची कामगिरी

आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाची कामगिरी सर्वात उत्कृष्ट राहिली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाने सर्व ३ आणि सुपर फोरमध्ये आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. सर्व ५ सामन्यांमध्ये टीम इंडियाने प्रतिस्पर्धी संघांना एकतर्फी हरवले आहे, ज्यात २ वेळा पाकिस्तानचा समावेश आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने आतापर्यंत ३ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. याशिवाय संघाची फलंदाजीही खूपच कमकुवत दिसली आहे.

टीम इंडिया स्क्वॉड: शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह.

पाकिस्तान टीम स्क्वॉड: सलमान अली आगा (कर्णधार), साहिबजादा फरहान, फखर जमान, सॅम अयूब, हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन नवाज, हुसैन तलत, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा, सुफियान मुकीम, खुशदील शाह.