Kitchen Tips: गॅस सिलिंडर संपलाय? टेंशन नका घेऊ, 'या' गोष्टींनी बनवा झटपट जेवण!
Kitchen Tips: गॅस शेगडीवर आपलं अवलंबून असणं खूप वाढलं आहे, त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याची बातमी चिंता वाढवते. पण महिलांनी थोडा स्मार्ट विचार केला, तर गॅसशिवायही स्वयंपाक करता येतो. यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही पद्धती, उपकरणांबद्दल जाणून घेऊया.

गॅस सिलिंडरला हे आहेत पर्याय
मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे आणि त्याचे परिणाम भारतीयांना भोगावे लागत आहेत. देशभरात पेट्रोल, डिझेलसोबतच एलपीजी गॅस सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. हैदराबादसह अनेक शहरांमध्ये हॉटेल्सना कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा थांबला आहे, ज्यामुळे हॉटेल्स बंद पडण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलिंडरच्या बुकिंगवरही निर्बंध वाढत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे.
इंडक्शन स्टोव्ह
एलपीजी सिलिंडरशिवाय स्वयंपाक करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातलाच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे इंडक्शन स्टोव्ह. इराण-इस्रायल युद्धामुळे याला पुन्हा मागणी वाढली आहे. विजेवर चालणारा हा स्टोव्ह मॅग्नेटिक लहरींच्या मदतीने भांडं गरम करतो आणि स्वयंपाक लवकर पूर्ण होतो. यात सुरक्षेसाठी चांगले फीचर्सही असतात, त्यामुळे गॅसच्या तुटवड्यात हा एक उत्तम पर्याय आहे.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर
आजकाल अनेक घरांमध्ये इलेक्ट्रिक प्रेशर कुकर एक महत्त्वाची वस्तू बनली आहे. यात भात, डाळ, भाज्यांसारखे पदार्थ सहज शिजवता येतात. प्रेशर कुकिंग आणि स्टीमिंगसारखे फीचर्स एकाच उपकरणात मिळत असल्याने स्वयंपाकाचा वेळ वाचतो. याच्या वापरामुळे एलपीजीचा वापर कमी करता येतो.
सोलर कुकर
गावांमध्ये नो प्रॉब्लेम..
खेड्यापाड्यात आजही अनेक घरांमध्ये चुलीचा वापर होतो. अंघोळीसाठी पाणी गरम करण्यापासून ते सणासुदीचे पदार्थ बनवण्यासाठी याच चुली वापरल्या जातात. गावांमध्ये सरपण (लाकूड) सहज उपलब्ध होतं. त्यामुळे एलपीजीचा तुटवडा किंवा दरवाढीचा ग्रामीण भागांवर फारसा परिणाम होत नाही. पण शहरात राहणाऱ्यांना मात्र इंडक्शन स्टोव्ह किंवा सोलर कुकरसारखे पर्याय शोधावे लागतील.

