MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: आंबोशी अशी एकदाच बनवा आणि वर्षानुवर्षे वापरा, चवही असेल मस्त!

Kitchen Tips: आंबोशी अशी एकदाच बनवा आणि वर्षानुवर्षे वापरा, चवही असेल मस्त!

Kitchen Tips: उन्हाळा आला की आंब्याचा सिझन सुरू होतो. पण सिझन संपल्यावर आंब्याची चव आठवून जीव कासावीस होतो. पण खाली सांगितलेल्या पद्धतीने कैरीच्या फोडी बनवून ठेवल्या, तर तुम्ही वर्षानुवर्षे त्याची चव घेऊ शकता.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 04 2026, 09:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मिठात मुरवून वाळवलेल्या आंब्याच्या फोडी
Image Credit : gemini

मिठात मुरवून वाळवलेल्या आंब्याच्या फोडी

आंध्र-ओडिशा सीमेवरच्या पदार्थांमध्ये 'अंबुला' (मिठात मुरवून वाळवलेल्या आंब्याच्या फोडी) या पारंपरिक पदार्थाला खास स्थान आहे. कच्च्या कैऱ्या उन्हात वाळवून हा पदार्थ तयार करतात. उन्हाळ्यात मिळणाऱ्या कैऱ्या सिझन संपल्यावरही वापरण्याची ही एक भारी पद्धत आहे. आंबट चवीसाठी डाळ, सार आणि भाज्यांमध्ये अंबुलाचा भरपूर वापर होतो. विशेषतः माशांच्या कालवणात (फिश करी) तर याची चव अप्रतिम लागते. योग्य पद्धतीने बनवल्यास हे महिनोनमहिने नाही, तर वर्षानुवर्षे टिकतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
अंबुला बनवण्याची कृती
Image Credit : gemini ai

अंबुला बनवण्याची कृती

अंबुला बनवण्यासाठी सगळ्यात आधी चांगल्या कच्च्या आणि कडक कैऱ्या निवडा. त्या स्वच्छ धुवून घ्या आणि पूर्णपणे कोरड्या होऊ द्या. ओलावा राहिल्यास वाळवताना बुरशी लागण्याचा धोका असतो. त्यानंतर कैरीच्या लहान फोडी करून घ्या. कोईजवळचा जो कडक भाग असतो, त्या फोडी घेतल्या तर त्या चांगल्या वाळतात आणि जास्त काळ टिकतात.

Related Articles

Related image1
Famous Mango Of India : लंगडा फकीर ते पोपटाची चोच, अशी पडली या भारतातील प्रसिद्ध आंब्यांची नावे
Related image2
Raw Mango Chutney: कैरीची ही चटणी एकदा करून बघा, घरातले बोटं चाटत राहतील!
36
मीठ आणि हळदीचे प्रमाण
Image Credit : gemini ai

मीठ आणि हळदीचे प्रमाण

आता या फोडी एका भांड्यात घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला. साधारण 4-5 कैऱ्यांसाठी 2 मोठे चमचे मीठ पुरेसं होतं. थोडी हळद घातल्यास रंगही छान येतो. आता या फोडींना मीठ-हळद लावून झाकण ठेवा आणि एक दिवस मुरू द्या. यामुळे फोडींमधला ओलावा बाहेर येतो आणि त्या वाळवायला सोप्या जातात.

46
फोडी कडक उन्हात वाळवा
Image Credit : gemini ai

फोडी कडक उन्हात वाळवा

आता या फोडी कडक उन्हात वाळवायच्या. कमीत कमी 4 ते 5 दिवस चांगल्या वाळू द्या. फोडी पूर्णपणे सुकल्या पाहिजेत आणि कुरकुरीत झाल्या पाहिजेत. मध्ये-मध्ये त्यांना उलट-पालट करत राहा, म्हणजे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित वाळतील. फोडींमध्ये अजिबात ओलसरपणा राहता कामा नये, नाहीतर त्या खराब होऊ शकतात.

56
वाळल्यावर काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यात भरा
Image Credit : gemini ai

वाळल्यावर काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यात भरा

फोडी पूर्णपणे वाळल्यानंतर त्यांना काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यात भरून ठेवा. या बरणीला ओल्या हाताचा स्पर्श होऊ देऊ नका, म्हणजे फोडी खूप काळ टिकतील. वापरताना नेहमी कोरडा चमचाच वापरा.
66
कोणत्या पदार्थांसाठी वापराल या फोडी
Image Credit : gemini ai

कोणत्या पदार्थांसाठी वापराल या फोडी

या वाळवलेल्या आंब्याच्या फोडींची खासियत म्हणजे, यांची चव साध्या कैरीपेक्षा थोडी वेगळी, जास्त तीव्र आणि चटपटीत आंबट असते. डाळीत किंवा आमटीत फक्त एक-दोन फोडी टाकल्या तरी पदार्थाची चवच बदलते. विशेषतः फिश करी, डाळ आणि सार यांसारख्या पदार्थांमध्ये या फोडी वापरल्यास त्याला एक अस्सल चव येते.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
Recommended image2
Most Expensive Areas India : भारतातील टॉप 5 सर्वात महागडे एरिया, एका बंगल्याची किंमत शेकडो कोटींत
Recommended image3
Online Shopping Rules : ऑनलाईन शॉपिंगचे नवे नियम.. या 7 गोष्टी नक्की करा
Recommended image4
Salary Calculation : 1 लाख रुपये पगार? पण तुमच्या बँक खात्यात नेमके किती पैसे येतात?
Recommended image5
Cooking Oil Price : खाद्यतेलाचे दर लिटरमागे 50 रुपयांनी घसरणार, कारण काय?
Related Stories
Recommended image1
Famous Mango Of India : लंगडा फकीर ते पोपटाची चोच, अशी पडली या भारतातील प्रसिद्ध आंब्यांची नावे
Recommended image2
Raw Mango Chutney: कैरीची ही चटणी एकदा करून बघा, घरातले बोटं चाटत राहतील!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved