सार
Lok Sabha Election 2024 : देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. यामधील पहिला टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. अशातच तुमच्या मतदान कार्डमध्ये नाव अथवा पत्त्यामध्ये बदल करायचा असल्यास कसा करायाच याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Voter ID Correction : मतदान कार्ड तयार करण्यासाठी बहुतांशवेळा शासकीय कार्यालयात धाव घ्यावी लागते. तरीही मतदान कार्डमध्ये काही ना काही चूक होते. अशातच पुन्हा मतदान कार्डावरील चूक सुधारण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची वेळ येते. या सर्व गोष्टींमध्ये अधिक वेळ जातो. पण मतदान कार्डामधील काही गोष्टींमध्ये चूक झाल्यास ती घरबसल्या सुधारू शकता. जाणून घेऊया मतदान कार्डामध्ये अपडेट करण्यासाठीची प्रोसेस स्टेप बाय स्टेप...
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकांना निवडणुकीवेळी मतदान करण्याचा हक्क असतो. अशातच मतदान कार्डमध्ये बदल किंवा अपडेट करायचे असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. खरंतर, मतदान कार्ड एक महत्त्वाचे ओखळपत्र मानले जाते. मतदान कार्ड भारतीय व्यक्तीला इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाकडून (Election Comission of India) जारी केले जाते. याशिवाय मतदान कार्डासाठी ऑनलाइन अर्जही करता येतो.
मतदान कार्डावरील नाव आणि पत्ता असा बदला
बहुतांशवेळेस असे होते की, तुम्हाला दुसऱ्या शहरात नोकरीच्या कारणास्तव जावे लागते. यावेळी मतदान कार्डावरील पत्ता कसा बदलायचा याबद्दल जाणून घेऊया सविस्तर... (Matadan card madhil patta ani nav kasa badlaycha)
मतदान कार्डावरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- तुम्ही एखाद्या नव्या निवडणूक क्षेत्रात स्थलांतरित झाला असल्यास मतदाराच्या रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म 6 वर क्लिक करा.
- तुम्ही एकाच निवडणूक क्षेत्रातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले असल्यास फॉर्म 8A वर क्लिक करा.
- आपले नाव, जन्मतारीख, राज्य, निवडणूक क्षेत्र, सध्याचा आणि बदलेला पत्त्यासह महत्त्वाची माहिती द्या.
- फोटो, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- आता डिक्लेरेशन ऑप्शन भरा आणि कॅप्चा कोड टाका.
- अखेर Submit पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला Correction of entries in electoral roll वर जावे लागेल आणि एक नवे पेज सुरू होईल.
- नव्या पेजवर फॉर्म 8 दिसेल. यामध्ये तुम्ही मतदान कार्डात बदल करू शकता.
- फॉर्म 8 मध्ये इलेक्टोरल रोल क्रमांक, लिंग, कुटुंबातील आई-वडील अथवा नवऱ्याची माहितीसह अन्य माहिती द्यावी लागेल.
- यानंतर पत्त्याची पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा कोणत्याही परवान्यापैकी एक कागदपत्र सादर करावे लागेल.
- आता रेफरेंस क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या माध्यमातून मतदान कार्डचे स्टेटस ट्रॅक करू शकता.
- अशाप्रकारे तुम्ही मतदान कार्डावरील पत्ता बदलू शकता.
असे बदला नाव आणि जन्मतारीख
मतदान कार्डावरील नाव आणि जन्मतारीख बदलण्यासाठी फॉर्म क्रमांक 8 भरावा लागेल. यानंतर तुम्ही नाव आणि जन्मतारीख बदलू शकता.
आणखी वाचा :