- Home
- Utility News
- Diabetic Friendly Meals On Trains: भारतीय रेल्वेचा हेल्दी धमाका! प्रवाशांसाठी डायबेटिक मेनूचा मोठा बदल, प्रवासात आरोग्य आणि स्वाद एकत्र
Diabetic Friendly Meals On Trains: भारतीय रेल्वेचा हेल्दी धमाका! प्रवाशांसाठी डायबेटिक मेनूचा मोठा बदल, प्रवासात आरोग्य आणि स्वाद एकत्र
Diabetic Friendly Meals On Trains: भारतीय रेल्वेने एक्सप्रेस गाड्यांत मधुमेही प्रवाशांसाठी खास डायबेटिक फूडची सुविधा सुरू केली. तिकीट बुकिंगवेळी डायबेटिक व्हेज, नॉन-व्हेज पर्याय निवडून प्रवासी आता प्रवासातही पौष्टिक, साखरमुक्त जेवणाचा आनंद घेऊ शकतात.

भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी आनंदाची घोषणा
Diabetic Friendly Meals On Trains: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता गाड्यांमध्ये प्रवास करताना डायबेटिक फूड उपलब्ध होईल, ज्यामुळे मधुमेही प्रवाशांना सुरक्षित आणि पौष्टिक जेवणाचा आनंद घेता येणार आहे.
नव्या मेनूमुळे प्रवास अधिक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट
रेल्वे बोर्डाने सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये डायबेटिक फूड उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तिकीट बुक करताना प्रवाशांना आता ‘डायबेटिक व्हेज’ किंवा ‘डायबेटिक नॉन-व्हेज’ असे पर्याय निवडता येतील. या सुविधेमुळे प्रवाशांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहील आणि प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही.
डायबेटिक फूडमध्ये काय असेल?
व्हेज पर्याय: डाळ, मिक्स भाजी (बटाट्याशिवाय), रोटी, सॅलड आणि साखरमुक्त डेझर्ट
नॉन-व्हेज पर्याय: बोन्लेस चिकन करी, ग्रिल्ड फिश, बॉईल्ड एग्ससह भाज्या
नाश्ता: व्हेज कटलेट, कुलचा-चणा आणि साखरमुक्त चहा/कॉफी
झोननुसार मेनूमध्ये स्थानिक चवीचा अनुभवही मिळेल.
मधुमेही प्रवाशांची काळजी कमी
या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना तूपकट, तेलकट किंवा साखरयुक्त पदार्थ टाळता येतील. घरगुती आणि पौष्टिक जेवणामुळे प्रवासात साखरेचे प्रमाण नियंत्रित राहील, आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखद होईल.
तिकीट बुकिंगवेळी निवडीचा पर्याय
आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवर तिकीट बुक करताना आता व्हेज, नॉन-व्हेज, जैन, डायबेटिक व्हेज आणि डायबेटिक नॉन-व्हेज असे पाच पर्याय दिसतील. प्रवाशांना त्यांच्यासाठी योग्य पर्याय निवडणे सोपे झाले आहे.
कोणत्या गाड्यांमध्ये सुविधा उपलब्ध?
सध्या ही सुविधा वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रात
मुंबई–सोलापूर वंदे भारत
सीएसएमटी–साईनगर शिर्डी वंदे भारत
पुणे–हुबळी वंदे भारत
मुंबई–दिल्ली राजधानी
मुंबई–हावडा दुरांतो
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. आता प्रवासातही चव आणि स्वास्थ्य यांचा उत्तम समतोल राहणार आहे.

