- Home
- Maharashtra
- Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!
Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!
Indian Railways Shock: दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटल्याने भारतीय रेल्वेने १५ नोव्हेंबरपासून ७६ रेल्वे फेऱ्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लातूर, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांवर झाला आहे.

प्रवाशांना मोठा धक्का! रेल्वेकडून तब्बल 76 फेऱ्या रद्द
Train Cancellation Update: दिवाळीचा उत्साह ओसरताच भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. सणानंतर प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून तब्बल ७६ रेल्वे फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक विभागांवर परिणाम
या निर्णयाचा सर्वाधिक फटका लातूर, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांना बसला आहे. या मार्गांवरील अनेक गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटली
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आणि छटपूजेच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक हजार अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्या काळात प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. साडेचारशे अतिरिक्त फेऱ्यांमध्ये तब्बल सात लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र सण संपताच परिस्थिती पूर्णतः बदलली. अनेक गाड्या आता अर्ध्या रिकाम्या धावताना दिसत आहेत. काही फेऱ्यांमध्ये केवळ ६० ते ७० टक्केच प्रवासी असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
रद्द झालेल्या गाड्या
रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई विभागातील काही गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.
हडपसर–लातूर
नागपूर–हडपसर
पुणे–अमरावती
कोल्हापूर–सीएसएमटी
कोल्हापूर–कलबुर्गी
प्रवाशांसाठी सूचना
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, तिकीट आरक्षण करण्यापूर्वी गाडीचे सध्याचे वेळापत्रक नक्की तपासावे. हा निर्णय फक्त तात्पुरता असून, प्रवाशांची मागणी पुन्हा वाढल्यास सर्व गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीनंतर कमी झालेला प्रवासी प्रतिसाद हेच या निर्णयामागचे मुख्य कारण आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून परिस्थितीनुसार लवचिक धोरण राबवले जाईल.

