सार

Indian Railway : भारतीय रेल्वेकडून समस्यांचे निदान करण्यासाठी स्पेशल हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. अशातच रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करताना काही क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करणे अत्यंत गरजेचे आहे.

Indian Railway Important Numbers : भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या ट्रेनच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. एवढ्याच मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासासंदर्भातील सातत्याने समस्याही निर्माण होतात. अशातच रेल्वेकडून काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जसे की, रेल्वेमध्ये अस्वच्छता, वीजेची समस्या, मोबाइल चार्जिंग समस्या अथवा अशाकाही समस्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन सोडवू शकता. खरंतर, रेल्वेचा हेल्पलाइन क्रमांक 139 संदर्भात सर्वांना माहिती आहे. याच क्रमांकावरुन जवळजवळ सर्व समस्यांचे निवारण केले जाते.

पण रेल्वेने विशिष्ट समस्यांसाठी काही स्पेशल हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. हेच क्रमांक प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या मोबाइलमध्ये सेव्ह असणे गरजेचे आहे. काहीवेळेस असे होते की, रेल्वेमधील समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. अथवा तक्रार केली जात नाही.

139 क्रमांक कशासाठी?
रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यानंकर कोणत्याही प्रकारची तक्रार करू शकता. रेल्वेकडून जारीर केलेल्या या क्रमांकावर बारा भाषांमध्ये तक्रार केल्यानंतर आयवीआरएस आणि कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांशी जोडले जाता. येथे वीज-पाण्यासंदर्भातील समस्या अथवा ट्रेनमध्ये चोर शिरल्यास त्याची तक्रार करू शकता.

स्वच्छता आणि वीजेची समस्या असल्यास.…
ट्रेनमधअये वेगवेगळ्या समस्या असतात. अशातच तुम्ही 7208073768/9904411439 क्रमांकावर फोन करुन तुमची समस्या सांगू शकता. या क्रमांकावर फोन केल्यानंतर कोचची स्वच्छता, वीजेसंबंधित समस्याा, एसी बिघडल्यास अशा काही तक्रारी करू शकता.

फोन व्यतिरिक्त एसएमएसच्या माध्यमातूनही रेल्वेकडे तक्रार करू शकता. यासाठी फोनच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन CLEAN लिहून 10 अंकी PNR क्रमांक टाकावा. यानंतर स्वच्छतेसाठी सी, पाण्याची समस्या असल्यास डब्लू, पेस्ट कंट्रोलची समस्या असल्यास पी, लाइट एसीसाठी ई आणि लहान-मोठ्या रिपेअरसाठी आर सर्विस कोड लिहून मोबाइल क्रमांक 7208073768 या 9904411439 पाठवून द्यावे.

जेवण ऑर्डर करण्यासाठी खास क्रमांक
ट्रेनमध्ये प्रवास करताना आयआरसीसीटीच्या 1323 क्रमांकावर फोन करुन जेवण ऑर्डर करू शकता. ही सेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असते. प्रवाशाच्या सीटच्या येथे जेवण ऑर्डर आणूनही दिली जाते. याशिवाय आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुनही जेवण बुक करू शकता.

आणखी वाचा : 

पत्नी-मुलं ते आई-वडिलांना EPFO च्या माध्यमातून मिळतात या 7 पेन्शन सुविधा, असा घ्या लाभ

तुम्हाला Income Tax ची आलीय? अशी तपासून पाहा खरी की खोटी