- Home
- Utility News
- पोस्ट ऑफिसमध्ये पत्नीच्या नावाने ₹1,00,000 ची एफडी केली तर २४ महिन्यांनंतर किती पैसे मिळतील?
पोस्ट ऑफिसमध्ये पत्नीच्या नावाने ₹1,00,000 ची एफडी केली तर २४ महिन्यांनंतर किती पैसे मिळतील?
मुंबई - आजही भारतात बरेच लोक आपल्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करतात. कर वाचवण्यासाठी असे केले जात असले, तरी याचे इतरही फायदे आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पत्नीच्या नावे एफडी केली तर व्याजारी आकर्षक रक्कम मिळते आणि पैसेही सुरक्षित राहतात.

पत्नीच्या नावाने एफडी व्याजदर:
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर चांगले व्याज देते. साध्या बचत खात्यांव्यतिरिक्त, टीडी (एफडी), एमआयएस, आरडी, किसान विकास पत्र अशा अनेक योजना पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. बँकेच्या एफडीसारखीच पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (TD) योजना आहे. ठराविक कालावधीनंतर ती मॅच्युअर होते आणि ग्राहकाला ठराविक व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते.
पत्नीच्या नावे खरेदी
भारतात मोठ्या प्रमाणात लोक मालमत्ता खरेदीपासून बचत योजनांपर्यंत पत्नीचे नाव निवडतात. मालमत्ता खरेदी करताना नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळवण्यासाठी देखील पत्नीच्या नावाने खरेदी केली जाते. कर बचतीसाठीही अनेक जण पत्नीच्या नावाने गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्षापासून ५ वर्षांपर्यंत एफडी करता येते.
पोस्ट ऑफिस एफडी व्याजदर:
१ वर्ष: ६.९%
२ वर्ष: ७.०%
३ वर्ष: ७.१%
५ वर्ष: ७.५%
हे दर सर्वसामान्य नागरिक आणि महिला वरिष्ठ नागरिकांसाठी सारखेच असतात.
उदाहरण:
जर तुम्ही पत्नीच्या नावाने ₹1,00,000 पोस्ट ऑफिसमध्ये २ वर्षांसाठी म्हणजेच २४ महिन्यांसाठी एफडी केली, तर मुदतपूर्तीनंतर एकूण ₹1,07,185 मिळतील.
व्याज ₹7,185 असेल
यामध्ये मूळ ठेव ₹1,00,000 आणि स्थिर व्याज ₹7,185 असेल. मात्र, पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिस एफडी घेण्यासाठी तिचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.