- Home
- Utility News
- Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची उत्तम संधी! 500 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची उत्तम संधी! 500 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकाऱ्यांच्या ५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ३० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात उज्वल करिअरची संधी शोधताय? मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे! बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकाऱ्यांच्या 500 रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.
भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती
भरती संस्था: बँक ऑफ महाराष्ट्र
पदांचे नाव: ऑफिसर (स्केल II आणि III)
पदांची एकूण संख्या: 500
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाइट: bankofmaharashtra.in
पात्रता (Eligibility)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री / एकात्मिक दुहेरी डिग्री आवश्यक (किमान 60% गुण – SC/ST/OBC/PWD साठी 55% गुण)
किंवा चार्टर्ड अकाउंटंट पात्र
वयोमर्यादा: किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व मुलाखत यावर आधारित असेल
लेखी परीक्षा: 150 गुण
मुलाखत: 100 गुण
अंतिम निवड 75:25 या गुण प्रमाणात केली जाईल.
सामान्य/EWS वर्गासाठी किमान 50%, तर SC/ST/OBC/PWD वर्गासाठी 45% गुण आवश्यक आहेत.
अर्ज शुल्क (Application Fee)
प्रवर्ग अर्ज शुल्क
सामान्य / EWS / OBC ₹1180
SC / ST / PWD ₹118
शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्या
“Careers” किंवा “Recruitment” सेक्शनमध्ये जाऊन भरतीची लिंक निवडा
आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा
अर्ज शुल्क भरा
अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घेऊन सुरक्षित ठेवा
शेवटी काय लक्षात ठेवाल?
ही भरती म्हणजे स्थिर, सन्माननीय आणि सुरक्षित बँकिंग करिअरची दारे उघडणारी संधी आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच अर्ज करा!

