HDFC बँकेचा मोठा निर्णय, UPI पेमेंटसाठी येणार नाही मेसेज, वाचा संपूर्ण माहिती सविस्तर

| Published : May 29 2024, 11:14 AM IST

HDFC bank share price

सार

एचडीएफसी बँकेने युपीआय पेमेंट संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने 100 रुपयांपेक्षा कमी रुपायंचे पेमेंट केल्यास एसएमएस येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेने नक्की काय म्हटलेय जाणून घेऊया सविस्तर...

HDFC Bank Alert : सध्या डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे सारखे काही युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशातच एचडीएफसी बँकेने युपीआय पेमेंट संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने म्हटले आहे की, कमी पैशांच्या ट्रांजेक्शनसाठी एसएमएस अ‍ॅलर्ट बंद करणार आहोत. हा नियम येत्या 25 जून पासून लागू केला जाणार. त्याआधीच बँकेने ग्राहकांना युपीआय पेमेंट संदर्भात माहिती दिली आहे.

बँकेने नक्की काय म्हटलेय?
एचडीएफसी बँकेने म्हटलेय की, 25 जूनपासून कमी रक्कमेच्या पेमेंटसंदर्भात एसएमएस (SMS) पाठवला जाणार नाही. दरम्यान, पैसे पाठवणे अथवा प्राप्त करण्यासाठी अ‍ॅलर्टची मर्यादा वेगवेगळी आहे. बँकेने ग्राहकांना सूचना दिली आहे की, 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील युपीआय पेमेंटचा एसएमएस मोबाइलवर पाठवला जाणार नाही. पण ईमेलच्या माध्यमातून प्रत्येक ट्रांजेक्शनचे अपडेट दिले जाईल. अशातच ग्राहकांनी आपला ईमेल आयडी अपडेट करावा अशी सूचना दिली आहे.

लहान रक्कमेसाठी युपीआयचा वापर
गेल्या काही वर्षांमध्ये युपीआयच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेपेक्षा लहान रक्कमेसाठी युपीआयचा अत्याधिक वापर केला जातोय. जेणेकरुन अवघ्या कमी वेळात आणि झटपट पद्धतीने एखाद्याला पैसे पाठवणे युपीआयच्या माध्यमातून सोईस्कर झाले आहे.

UPI पेमेंटसाठी बँक खाते कसे लिंक करावे?

  • सर्वप्रथम युपीआय सुविधा पुरवाणारे अ‍ॅप डाउनलोड करा.
  • डाव्या बाजूला प्रोफाइलवर क्लिक करा
  • युपीआय आणि पेमेंट सेटिंग्स निवडा.
  • बँक अकाउंटपर्यंत स्क्रोल करा.
  • खाते लिंक करण्यासाठी बँक निवडा.
  • पुढील पेजवर डिफॉल्टच्या रुपात सेट करा.
  • अशाप्रकारे बँक खाते युपीआयला लिंक झाल्यानंतर पेमेंट करू शकता.

आणखी वाचा : 

WhatsApp अकाउंट चुकून ब्लॉक झालेय? Unblock करण्याची सोपी ट्रिक घ्या जाणून स्टेप बाय स्टेप

SBI कडून ग्राहकांना अ‍ॅलर्ट, SMS आणि व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या मेसेजसंदर्भात दिलीय ही महत्त्वाची सूचना