WhatsApp अकाउंट चुकून ब्लॉक झालेय? Unblock करण्याची सोपी ट्रिक घ्या जाणून स्टेप बाय स्टेप

| Published : May 28 2024, 11:41 AM IST

WhatsApp New Feature

सार

व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट, स्पॅम अकाउंट ब्लॉक केले जातात. कारण अज्ञात व्यक्तीकडून तुम्हाला चुकीच्या उद्देशाने मेसेज पाठवले जातात. अशातच अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. ब्लॉक झालेले अकाउंट कसे अनब्लॉक करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

WhatsApp Unblock Trick : मेटाचे मालकी हक्क असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपकडून प्रत्येक महिन्याला तीन लाख अकाउंट बंद केले जातात. यामध्ये बनावट, स्पॅम अकाउंट्सचा समावेश आहे. अशातच कधीकधी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद होऊ शकते. कारण अज्ञातपणे एखाद्याने पाठवलेल्या चुकीच्या मेसेजमुळे अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते. खरंतर, अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. यामध्ये कायमचे अकाउंट बंद होणे आणि दुसरा प्रकार म्हणजे अस्थायी रुपात अकाउंट बंद होणे. अशातच ब्लॉक झालेले अकाउंट कशाप्रकारे अनब्लॉक करायचे याबद्दल जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक म्हणजे काय?

  • तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर अन्य GB व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असल्यास तुमचा क्रमांक ब्लॉक होऊ शकतो.
  • अश्लील अथवा एडिटेड फोटो, कंटेट शेअर केल्यानेही मोबाइल क्रमांक व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केला जाऊ शकतो.
  • फेक अकाउंट तयार करणे आणि स्पॅम लिंक शेअर करणे.
  • दुसऱ्या युजर्सच्या प्रायव्हेसीचे उल्लंघन केल्यानेही अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
  • अकाउंट सहा महिने अथवा 180 दिवसांपर्यंत वापर न केल्यास बंद होऊ शकते.
  • एखाद्या युजरने तुमच्या मेसेज अथवा अकाउंटला स्पॅम किंवा बनावट रिपोर्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनब्लॉक कसे करायचे

  • तुमचे अकाउंट अस्थायी रुपात ब्लॉक झाले असल्यास त्यावर तसे लिहिलेले दिसेल. यामध्ये देण्यात आलेल्या टाइममध्ये लॉग-इन केल्यास अकाउंट रिकव्हर होऊ शकते.
  • स्थायी ब्लॉक झालेले अकाउंट ब्लॉक झाल्यास तुम्ही अकाउंट रिकव्हर करू शकता.
  • अकाउंट अनब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम कॉन्टॅक्ट सपोर्टचा पर्याय दिसेल.
  • पुढे रिक्वेस्ट अ रिव्हूवर क्लिक करा. येथे ईमेलचा ऑप्शन दिसेल.
  • तुमच्याकडून जी चूक झालीय त्याबद्दल सांगावे लागेल. याचा स्क्रिनशॉट काढून ठेवू शकता.
  • संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मेसेज बॉक्समध्ये ओटीपी येईल.
  • ईमेल व्यवस्थितीत वाचून झाल्यानंतर पाठवा.
  • 24 तासात तुमचे अकाउंट रिकव्हर होऊ शकते.

आणखी वाचा : 

Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती

Jio Cinema ची नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनला टक्कर, कंपनीकडून 'या' धमाकेदार प्लॅनची घोषणा