- Home
- Utility News
- Royal Enfield 350 गाडीची बातच न्यारी, 'या' देशात होणार बाईकची विक्री, किंमत वाचून म्हणाल कधी काढायचं कोटेशन?
Royal Enfield 350 गाडीची बातच न्यारी, 'या' देशात होणार बाईकची विक्री, किंमत वाचून म्हणाल कधी काढायचं कोटेशन?
रॉयल एनफिल्डने आपल्या लोकप्रिय क्लासिक 350 चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे, ज्यात अपडेटेड फीचर्स आणि चार नवीन रंगांचे पर्याय आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये विक्रमी विक्री नोंदवल्यानंतर, ही बाईक आता नेपाळमध्येही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Royal Enfield 350 गाडीची बातच न्यारी, 'या' देशात होणार बाईकची विक्री, किंमत वाचून म्हणाल कधी काढायचं कोटेशन?
रॉयल एनफिल्ड गाडी बाईक रायडर्सना प्रचंड आवडते. या गाडीची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं आहे. आजही भारतातील रस्त्यांवर आपल्याला हि गाडी फिरताना दिसून येत असते.
कंपनीने नवीन मॉडेल केलं लॉन्च
रॉयल एनफिल्ड कंपनीने बुलेटच्या क्लासिक प्रकारातील नवीन रूप लॉन्च केलं आहे. त्या गाडीमध्ये काही फीचर्स अपडेट केले असून त्यामुळं मार्केटमध्ये या गाडीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून येत आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये गाडीची झाली विक्रमी विक्री
सप्टेंबर २०२४ मध्ये या गाडीची विक्रमी विक्री झाली आहे. कंपनीच्या हजारो बाईक्स विकल्या असून बाईक शौकिनांनी बाईक खरेदी करण्यासाठी गर्दी केली असल्याचं सांगण्यात आलं.
गाडीत किती कलर उपलब्ध?
या गाडीमध्ये चार कलर कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळं बाईक खरेदी करताना रायडर्सला आता मोठ्या प्रमाणावर ऑप्शन्स उपलब्ध होतील.
गाडीची नेपाळमध्ये केली जाणार विक्री
या गाडीची विक्री आता नेपाळमध्ये केली जाणार आहे. त्यामुळं नेपाळमध्ये असणाऱ्या बाईक शौकिनांच्या आनंदात भर पडली आहे. नेपाळमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 5,55,000 नेपाळी रुपयांपासून 5,79,900 नेपाळी रुपयांपर्यंत असेल.
भारतात गाडीची किती आहे किंमत?
भारतात या गाडीची किंमत 1,93,500 रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 2,30,000 रुपयांपर्यंत जाते. क्लासिक 350 ची टक्कर जावा 350 आणि होंडा हनेस सीबी 350 शी आहे. ही बाईक जवळपास 20-30 किमीचे मायलेज देते.

