सार
Lok Sabha Election 2024 : देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला असणार आहे. अशातच आसाममधील एका परिवारात हजारोंच्या संख्येने राहणाऱ्या नागरिकांची चर्चा सुरू झाली आहे.
Assam Big Family : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला असणार आहे. अशातच आसाममधील अशा एका परिवाराची माहिती समोर आलीय ज्यामध्ये हजारो सदस्य राहतात. यापैकीच 350 जण यंदाच्या निवडणुकीवेळी मतदान करणार आहेत. आसाममधील सोनितपुर जिल्ह्यातील फुलगुरी नेपाळी पाम गावात हा परिवार राहतो. आसामधील सर्वाधिक मोठ्या परिवारांपैकी एक दिवंगत रॉन बहादुर (Late Ron Bahadur Thapa) थापा यांचा परिवार 350 जणांसोबत 19 एप्रिलला मतदान करणार आहे.
आसाममधील सोनितपुर जिल्हा रंगपारा विधानसभा क्षेत्र आणि सोनितपुर संसदेच्या क्षेत्रात येतो. रॉन बहादुर थापा यांना 12 मुलं आणि 9 मुली आहेत. रॉन बहादुर थापा यांच्या एकूण पाच पत्नी होत्या. असे सर्वजण मिळून 1200 सदस्य असणारा थापा यांचा परिवार आहे. याशिवाय 150 हून अधिक नातवंड आहेत.
फुलोगुरी नेपाळी पाम गावातील थापा परिवार
सोनितपुर संसदेच्या क्षेत्रातील फुलोगुरी नेपाळी पाम परिसरात एकाच पूर्वजांची सुमारे 300 कुटुंबे राहतात. नेपाळी पाम गावाचे ग्रामसेवक आणि दिवंगत रॉन बहादुर थापा यांचा मुलगा तिल बहादुर थापा यांच्या संपूर्ण परिवारातील 350 जण यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदान करणार आहेत.
56 नातवंड आणि 350 जण मतदान करण्यास पात्र
तिल बहादुर थापा यांनी एएनआयला सांगितले की, रॉन बहादुर थापा वर्ष 1964 मध्ये आजोबांसोबत सोनितपुर जिल्ह्यातील फुलगुरी नेपाळी पाम गावात आले होते. माझ्या वडिलांच्या पाच पत्नी होत्या. मला 12 भाऊ आणि 9 बहिणी आहेत. त्यांची एकूण 56 नातवंड होती. मला माहिती नाही मुलीपासून किती नातवंड आहेत. पण नेपाळी पाममध्ये थापा परिवारातील जवळजवळ 350 सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. आमच्या संपूर्ण परिवारात 1200 पेक्षा अधिक सदस्य राहतात.
तिल बहादुर यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनांचा लाभ घेता आला नाही. आमच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले पण त्यांना शासकीय नोकरी मिळाली नाही. कुटुंबातील काही सदस्य बंगळुरुला गेले आणि तेथे खासगी नोकरी शोधली. काहीजण मजूराच्या रूपात काम करतात. मी वर्ष 1989 पासून ग्रामसेवकाच्या रूपात काम करतो. मला आठ मुल आणि तीन मुली आहेत.
12 मुल आणि 9 मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी
तिल बहादुर यांनी म्हटले की, रॉन बहादुर थापा यांनी 12 मुलं आणि 9 मुलींचे पालनपोषण केले. आमचे कुटुंब फार मोठे असून त्यामधील 350 जण मतदान करणार आहेत. नातेवाईकांनुसार, रॉन बहादुर यांचा मृत्यू वर्ष 1997 मध्ये झाला. आता 64 वर्षीय सरकी बहादुर थापा यांच्या तीन पत्नी आणि 12 मुलं आहेत.
आणखी वाचा :
सरबजीतच्या मारेकऱ्याची लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीने केली गोळ्या घालून हत्या
Lok Sabha Election 2024 : "मोदी की गॅरेंटी " भाजपच्या जाहीरनाम्यातील 30 महत्वाची आश्वासने कोणती ?