Lok Sabha Election 2024 : मोफत रेशन योजना, महिला सक्षमीकरण भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने?वाचा सविस्तर

| Published : Apr 14 2024, 11:10 AM IST / Updated: Apr 14 2024, 11:11 AM IST

Bjp manifesto 00 0.jp
Lok Sabha Election 2024 : मोफत रेशन योजना, महिला सक्षमीकरण भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने?वाचा सविस्तर
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहे. विकसित भारत ते देशात एक निवडणूक, आर्थिक प्रगती, आयुष्मान भारत योजनेचा विस्तार, ३ कोटी घरे, मोफत वीज, पर्यटन विकास या सारख्या अनेक घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.

तरुणांसाठी स्टार्टअप अन् गुंतवणूक :

तरुणांसाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, क्रीडा, उच्च मूल्य सेवा आणि पर्यटनाचे नवीन मार्ग खुले होतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल:

भाजपने आपल्या ठराव पत्रात आयुष्मान भारत योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळतील असे आश्वासन दिले आहे. भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. प्रत्येक नागरिकाला चांगले शिक्षण दिले जाईल.

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला मोफत उपचार :

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, मग तो गरीब असो वा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय. त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार असल्याचे देखील यात नमूद केले आहे.

वीज बिल शून्य करणार :

वीज बिल शून्यावर आणण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर बिलजी योजना सुरू करण्यात येणार आहे. घरात मोफत वीज, तसेच अतिरिक्त विजेचे पैसेही दिले जाणार आहे.

मुद्रा योजनेची मर्यादा २० लाख :

मुद्रा योजनेची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. तृतीय पंथियांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या : 

 • मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
 • गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.
 • ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
 • ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.
 • मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
 • गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार.
 • मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यं वाढवणार
 • तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
 • गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.
 • घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार.
 • पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
 • सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.
 • देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.
 • पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
 • जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार.
 • उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार.
 • महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.
 • कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार.
 • कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार.
 • महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.
 • ३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार.
 • मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.

आणखी वाचा:

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत

 

Read more Articles on