Lok Sabha Election 2024 : मतदान कार्ड हरवलेय? ऐन निवडणुकीवेळी असे करता येईल मतदान

| Published : Apr 26 2024, 10:36 AM IST

voter id 1

सार

Lok Sabha Election 2024 : ऐन निवडणुकीच्या काळात मतदान कार्ड हरवलेय? तर घाबरण्याची काहीज गरज नाही. तुम्ही मतदान कार्डशिवायही निवडणुकीसाठी मतदान करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या टप्प्यात 13 राज्यांसह 88 मतदारसंघात मतदान करणार आहेत. खरंतर, देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. अशातच ऐन निवडणुकीवेळी मतदान कार्ड हरवल्यास मतदान कसे करणार याची चिंता करू नका. निवडणूक आयोगानुसार, मतदान कार्ड हरवले असल्यास तरीही नागरिकांना निवडणुकीवेळी मतदान करता येणार आहे.

मतदान कार्डशिवाय असे करा मतदान
तुमच्याकडे मतदान कार्ड नसल्यास तरीही निवडणुकीवेळी मतदान करू शकता. यासाठी तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असणे आवश्यक आहे. याशिवाय कोणता पर्याय आहे पाहूयात....

  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वाहन परवाना
  • मनरेगा कार्ड
  • केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असल्यास आयडी कार्ड
  • फोटो असलेले पेंन्शन कार्ड

याशिवाय मतदार यादीत नाव नसल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाइनसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म-6 भरा. यानंतर व्यक्तीगत माहिती आणि ओखळपत्रे सादर करावी लागतील. फॉर्म सबमिट करा.

ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यासाठी निवडणूक रजिस्ट्रेशन कार्यालय किंवा बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून फॉर्म-6 घ्या. याव्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, रेशन कार्ड आणि जन्म दाखला अशी ओखळपत्र तयार ठेवा.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी ही कागदपत्रे महत्त्वाची

  • मतदान
  • मतदार यादी अपडेट करण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.
  • तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.
  • जन्म दाखला असणे अत्यावश्यक आहे.
  • तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, वीज बील असावे.

आणखी वाचा : 

Voter Education : घरबसल्या मतदान कार्डमध्ये असा बदला पत्ता आणि नाव, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई, नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यावर घातलीय बंदी; जाणून घ्या कारण

Read more Articles on