कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई, नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यावर घातलीय बंदी; जाणून घ्या कारण

| Published : Apr 25 2024, 07:31 AM IST / Updated: Apr 25 2024, 07:36 AM IST

Kotak Mahindra Bank
कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई, नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यावर घातलीय बंदी; जाणून घ्या कारण
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

RBI on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई करत नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी बंदी घातली आहे.

RBI action On Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्राच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रावर कारवाई करत बँकेला नवे ग्राहक जोडणे आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली आहे. खरंतर ही बंदी ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून जोडले जाणारे नवे ग्राहक आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी असणार आहे.

आरबीआयची कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई
आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई करत ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नव्या ग्राहकांना जोडता येणार नाही असे आदेश दिले आहेत. याशिवाय बँक क्रेडिट कार्डही जारी करू शकत नाही. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेने स्पष्ट केलेय की, सध्याच्या ग्राहकांना आणि क्रेडिट कार्ड धारकांना आधीसारख्याच सुविधा मिळणार आहेत.

आरबीआयने कारवाई करत नक्की काय म्हटले?
बुधवारी (24 एप्रिल) जारी केलेल्या निर्देशानुसार, आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, ग्राहक संबंधित व्यवस्थापन, डेटा सिक्युरिटी, डेटा लीक झाल्यास काय करावे, आपत्तीच्या वेळी ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीची व्यवस्था या गोष्टींबद्दल पुरेशी सुव्यवस्था नाही. यामधील ज्या त्रुटी दूर करण्यासाठी आरबीआयने दिलेल्या सल्ल्यानुसार काही गोष्टी बँकेने केल्या पण समाधानकारक नव्हत्या. 

आरबीआयने असेही म्हटले की, दोन वर्षांपर्यंत बँकेच्या त्रुटींबद्दल कळले आणि त्या दूर करण्यासाठी जे करणे अपेक्षित होते ते बँकेने केले नाही. यामुळे असे दिसून येते की, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यात बँकेचे व्यवस्थापन किती निष्काळजीपणा करतेय. 

आरबीआयने बँकेच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. यामध्ये देखील त्रुटी असल्याने सातत्याने समस्या उद्भवत आहेत. 15 एप्रिललाच बँकेची ऑनलाइन सेवा याच त्रुटींमुळे प्रभावित झाली होती. यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. यावर तोडगा काढण्याबाबत बँक गंभीर नसल्यासह त्यांच्याकडे पुरेसे धन नसल्याचाही अप्रत्यक्षपणे आरोप आरबीआयने लावला आहे. याशिवाय एका बाजूला जुन्या समस्यांवरच तोडगा निघालेला नाही. दुसऱ्या बाजूला बँकेत ऑनलाइन ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे दबाव वाढतोय असेही आरबीआयने म्हटले आहे.

आणखी वाचा : 

Schengen Visa : भारतीयांना युरोपातील 29 देशांत फिरणे होणार सोपे, युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल

RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार