टोयोटा कंपनीची हायड्रोजन कार किती किलोमीटर पळणार, पेट्रोल आणि डिझेलचं मिटलं टेन्शन
टोयोटाने भारताच्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेसोबत करार करून हायड्रोजन इंधन-सेलवर चालणाऱ्या 'मिराई' कारची भारतात रोड टेस्टिंग सुरू केली आहे. या चाचणीत कारची रेंज, मायलेज आणि भारतीय रस्त्यांवरील कामगिरी तपासली जाईल.

टोयोटा कंपनीची हायड्रोजन कार किती किलोमीटर पळणार, पेट्रोल आणि डिझेलचं मिटलं टेन्शन
टोयोटाने भारताच्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेशी करार केला आहे. त्यामुळं सरकारी संशोधन संस्थेला त्यांच्या हायड्रोजन इंधन-सेलमुळे टोयोटा मिराई कारची भारतात पहिल्यांदाच रोड टेस्टिंग सुरू करतील.
टोयोटा हायड्रोजनवर कार करणार सादर
टोयोटा हायड्रोजनवर आधारित असणारी कार मार्केटमध्ये आणणार आहे. पण या कारची कंपनीकडून कोणत्याही प्रकारची चाचणी घेण्यात आली नव्हती. या कारची दिल्लीत चाचणी घेण्यात आली होती.
टोयोटाने काही वर्षांपूर्वी कार केली होती सादर
टोयोटाने कार काही वर्षांपूर्वी विविध पॅरामीटर्सवर करेल, ज्यामध्ये मायलेज, रेंज, ड्रायव्हिंग अनुभव, हायड्रोजन रिफिलिंग प्रक्रिया आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थिती आणि तापमानात कामगिरी, तसेच धूळ, ट्रफिक आणि इतर सामान्य भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीचा कार टेस्टिंगमध्ये किती फरक पडतो हे देखील जाणून घेणार आहेत.
टेस्टिंग एका योजनेचा भाग
टेस्टिंग एका योजनेचा भाग असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. MNRE चे मिशन डायरेक्टर अभय भगरे यांनी सांगितले की, हा प्रकल्प जड वाहनांच्या पायलटपेक्षा जास्त हायड्रोजन ऊर्जा वाढवण्याची सुरुवात आहे.
एकाच वेळी गाडी किती धावणार?
एकाच वेळी हि गाडी जवळपास ६३० किलोमीटर धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही कार अंदाजे 650 किमी प्रवास करू शकते आणि 525.4 किलो हायड्रोजन रिफिलिंगने फूल होते. तर हायड्रोजन रिफिलिंगला 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, ही प्रक्रिया पेट्रोल किंवा डिझेल रिफिलिंगसारखीच आहे.
हायड्रोजन कारची का आवश्यकता आहे?
भारत हि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून भविष्यात ऊर्जेचा वापर लक्षणीयरीत्या वाढणार आहे. जर आपल्याला ऊर्जा स्वावलंबी व्हायचे असेल, विकसित भारताचे ध्येय साध्य करायचे असेल आणि प्रदूषण कमी करायचे असेल तर रिन्यूएबल ऊर्जा आवश्यक आहे.

