MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार; कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी गर्जना

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार; कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी गर्जना

Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेत 'लाडकी बहीण' योजनेचा हप्ता २१०० रुपये करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. त्यांनी विरोधकांवर टीका करत ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असल्याची घोषणा केली. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 01 2026, 09:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार
Image Credit : social media

'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार

कोल्हापूर : "एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक मदत देऊन मी थांबणार नाही, तर त्यांना लखपती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या कागलमधील जाहीर सभेतून विरोधकांना ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. 

25
जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार
Image Credit : social media

जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार

कोल्हापूरच्या रणसंग्रामात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या युतीवर बोळा फिरवला.

जनतेचा कौल महत्त्वाचा: "काही लोक केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. पण ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. जनताच ठरवते कुणाला आपलं मानायचं," असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेचा करिष्मा: कोल्हापुरात शिवसेनेचे ५ आमदार आणि १ खासदार असल्याचे सांगत, शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. 

Related Articles

Related image1
New Mobile: iPhone 18च्या स्टॅण्डर्ड मॉडेलसाठी आणखी पाहावी लागणार वाट! कारण काय?
Related image2
Budget 2026: मोदी सरकारचा युरियाबाबत मोठा निर्णय; आता 'या' भावात शेतकऱ्यांना मिळणार खताची पिशवी
35
लाडक्या बहिणींना 'भावा'चे आश्वासन
Image Credit : iSTOCK

लाडक्या बहिणींना 'भावा'चे आश्वासन

उपमुख्यमंत्र्यांनी महिला मतदारांना भावनिक साद घालत म्हटले की, "ज्या उमेदवाराच्या मागे महिला शक्ती उभी राहते, त्याचा विजय निश्चित असतो. मी केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर दर महिन्याला ओवाळणी देणारा 'भाऊ' म्हणून आज मतांची विनंती करायला आलो आहे." लवकरच योजनेची रक्कम वाढवून ती २१०० रुपये केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. 

45
संजय मंडलिक आणि कार्यकर्त्यांना बळ
Image Credit : iSTOCK

संजय मंडलिक आणि कार्यकर्त्यांना बळ

खासदार संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत उपमुख्यमंत्री म्हणाले, "संजय मंडलिक, तुम्ही एकटे नाही आहात, संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे." जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका हा पक्षाचा पाया असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

55
भावूक क्षण, अजितदादांना अभिवादन
Image Credit : iSTOCK

भावूक क्षण, अजितदादांना अभिवादन

भाषण करताना उपमुख्यमंत्री भावूक झाले होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करत ते म्हणाले, "अशा दुःखद प्रसंगातही प्रचाराला यावं लागतंय, कारण निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते आणि ती पुढे ढकलणं शक्य नसतं. आम्ही अत्यंत साधेपणाने प्रचार करून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेत आहोत."

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! एक्स्प्रेसवे होणार '१० पदरी'; पण प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ, वाचा काय आहे अपडेट
Recommended image2
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वरुणराजाचं आगमन! ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा
Recommended image3
Pune Railway Station: पुणेकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक! वर्षभरात ६ नवे फलाट; १७०० कोटींच्या विकासकामांनी स्टेशनचा कायापालट
Recommended image4
महात्मा फुले योजना ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गंभीर आजारांसाठी सरकारी मदतीचा 'मास्टर प्लॅन'; असा करा अर्ज!
Recommended image5
महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!
Related Stories
Recommended image1
New Mobile: iPhone 18च्या स्टॅण्डर्ड मॉडेलसाठी आणखी पाहावी लागणार वाट! कारण काय?
Recommended image2
Budget 2026: मोदी सरकारचा युरियाबाबत मोठा निर्णय; आता 'या' भावात शेतकऱ्यांना मिळणार खताची पिशवी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved