- Home
- Utility News
- पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा ट्रायल यशस्वी, लवकरच प्रवासी सेवा सुरू
पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा ट्रायल यशस्वी, लवकरच प्रवासी सेवा सुरू
Pune Metro Line 3 Start Date : हिंजवडी आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन-3 ने आरडीएसओची अनिवार्य सुरक्षा तपासणी यशस्वीपणे पूर्ण केली. मेट्रो गाड्यांचा पुरवठा, स्थानकांचे काम वेगात सुरू असल्याने प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा ट्रायल यशस्वी
पुणे : पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! हिंजवडी आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन-3 प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या मेट्रो मार्गावर सेवा कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा करत होते. आता मात्र प्रत्यक्ष प्रवासी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
यशस्वी आरडीएसओ तपासणी
हिंजवडी मार्गाची आरडीएसओ (Research Designs and Standards Organization) द्वारे करण्यात येणारी अनिवार्य सुरक्षा तपासणी यशस्वी झाली आहे. यात ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि इतर सुरक्षिततेशी संबंधित बाबी तपासल्या गेल्या. या यशस्वी ट्रायलमुळे मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मेट्रो गाड्यांचा पुरवठा वेगात
पीएमआरडीएच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक मेट्रो ट्रेनसेट्स (रोलींग स्टॉक)चा पुरवठा वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 14 मेट्रो गाड्या पुण्यात दाखल झाल्या आहेत, तर एकूण 22 गाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील. या गाड्यांच्या साहाय्याने ट्रायल रन आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्यानंतर नियमित प्रवासी सेवा सुरू होईल.
स्थानकांची तयारी जवळपास पूर्ण
स्थानकांच्या इमारती, फलाट, ये–जा मार्ग आणि इतर मूलभूत सुविधा जवळपास तयार झाल्या आहेत. विभागांमध्ये समन्वय साधून संपूर्ण मार्ग लवकर सुरू करण्यासाठी काम वेगात सुरू आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला दिलासा
हिंजवडीतील हजारो आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.

