सार

एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अ‍ॅलर्ट जारी केला आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना येणारे एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजसंदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते असेही बँकेने आपल्या सूचनेत म्हटले आहे.

SBI Alert : एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांनी फसवणूकीला बळी पडू नये म्हणून एक महत्त्वाचा अ‍ॅलर्ट जारी केला आहे. खरंतर, बँकेकडून ग्राहकांना प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी रॉयल्टी प्रोग्रामअंतर्गत एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सची सुविधा दिली जाते. या प्रत्येक पॉइंटची किंमत 25 पैसा अशी आहे. याच संदर्भात एसबीआयने ग्राहकांना महत्त्वाची सूचना देण्यासाठी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे.

एसबीआयची सोशल मीडियावरील पोस्ट
एसबीआयने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बँकेने म्हटले आहे की, फसवणूकदार तुम्हाला APK आणि SMS सह व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एसबीआयचे रिवॉर्ड पॉइंट वापरण्यासंदर्भात एक मेसेज पाठवतात.

या पोस्टमध्ये बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, एसबीआयकडून कधीच लिंक किंवा एसएमएस अथवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एपीके लिंक पाठवत नाही. यामधील लिंकवर क्लिक करणे अथवा अज्ञात फाइल डाउनलोड करू नये असेही बँकेने ग्राहकांना सांगितले आहे.

APK File नक्की काय आहे?
एपीके फाइल एका अ‍ॅपसारखी दिसते असते. खरंतर, ती अ‍ॅन्ड्रॉइड प्ले स्टोरमध्ये उपलब्ध नसून फाइलचे एक रुप आहे. ती मोबाइलमध्ये इंस्टॉल करुन वापरता येते. हॅकर्स नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एपीके फाइलचा वापर करून डिवाइस अगदी सहज हॅक करू शकतात.

या बँकांनीही जारी केलाय
अ‍ॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एयू स्मॉल फायनेंस पीएनबी बँकने देखील आपल्या ग्राहकांना अ‍ॅलर्ट जारी केला आहे. बँकेने म्हटलेय की, बँक कधीच आपल्या ग्राहकांना ईमेल आयडी, व्यक्तीगत मेसेज अथवा फोन करुन ओटीपी मागत नाही. यामुळे एखादा फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून तुमची व्यक्तीगत माहिती मागितल्यास देऊ नये.

आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी बँकेने म्हटलेय की, ग्राहकांकडे ईमेल आयडी, मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप अथवा अन्य माध्यमातून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. याशिवाय संशयित किंवा थर्ट पार्टी अ‍ॅप मोबाइलमध्ये इंस्टॉल करू नये.

आणखी वाचा : 

WhatsApp वर प्रोफाइल फोटोसाठी खास फिचर होणार लाँच, दररोज बदलता येईल DP

प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या फोनमध्ये सेव्ह असावेत हे 4 महत्त्वाचे क्रमांक, लगेच होईल समस्येचे निवारण