Gold Silver Rate 3 July 2026 : सोने दरात वाढ झाली आहे. तर चांदीचा दरही वधारला आहे. सोने-चांदीच्या किमती वाढीमागे अनेक कारणं सांगण्यात आली आहे. मागील काही दिवसांत सोने दर घसरला होता. आता मात्र पुन्हा दरवाढ झाली आहे. 

मुंबई : सोने-चांदी दरात सतत चढ-उतार होत आहेत. सोने-चांदीच्या वाढीसाठी अनेक गोष्टी कारण ठरत आहेत. अमेरिका-इराणमधील संघर्ष , अमेरिकेतील फेडरल बँकेच्या व्याज दरात वाढ होण्याची भीती अशा अनेक गोष्टींचा परिणाम मौल्यवान धातूवर होताना दिसतो आहे. आज आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सोने - चांदी दर वाढीमागे कारण काय?

मागील महिन्यात जूनमध्ये सोने दरात काहीशी घसरण झाली होती. मात्र आता जुलै महिन्याच्या सुरूवातीला मौल्यवान धातून किमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेत लेबर मार्केट डेटा अपेक्षेपेक्षा कमकुवत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दरात वाढ करणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानंतर सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचा दर २३०० रुपयांनी वाढला आहे. तर चांदीचा दर ५००० रुपयांनी वधारला आहे.

सराफा बाजारात काय आहेत किमती?

सराफा बाजारातही सोने - चांदी दर वधारला आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३२२० रुपयांनी वाढला आहे. या वाढीमुळे सोन्याचा दर १,४७,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर २९५० रुपयांनी वाढला आहे. या वाढीनंतर सोन्याचा भाव १,३४,७५० रुपयांवर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात २४१० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१०,२५० रुपये इतका आहे.

दुसरीकडे चांदीचा भावदेखील वधारला आहे. चांदीचा दर ५००० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचा भाव या वाढीसह २,५०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.