जानेवारी २०२६मध्ये ५ मिडसाईज SUV मार्केटमध्ये येणार, आजच माहिती जाणून घ्या
२०२६ मध्ये ५ नवीन एसयूव्ही गाड्या बाजारात दाखल होणार आहेत, ज्यात नवीन किया सेलटॉस, रेनॉल्ट डस्टर, स्कोडा कुशाक फेसलिफ्ट, टाटा सिएरा ईव्ही आणि मारुती ई विटारा यांचा समावेश आहे.

जानेवारी २०२६मध्ये ५ मिडसाईज SUV मार्केटमध्ये येणार, आजच माहिती जाणून घ्या
सध्याच्या काळात एसयूव्ही गाड्या घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आता जानेवारी महिन्यात नवीन गाड्या येणार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
New-Gen Kia Seltos
नवीन किया सेलटॉसच्या बुकिंगला देशभरात सुरुवात झाली आहे. या गाडीची किंमत २ जानेवारी २०२६ रोजी घोषित केली जाणार आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत 2026 किआ सेल्टोस 95 एमएम लांब, 30 एमएम रुंद आहे आणि याचा व्हीलबेस 80 एमएम लांब आहे.
New Renault Duster
रेनॉल्ट कंपनीची डस्टर गाडी मार्केटमध्ये आली आहे. या गाडीची ग्राहक प्रतीक्षा करत असून ती २६ जानेवारीला मार्केटमध्ये येणार आहे. मॉड्युलर CMF-B प्लॅटफॉर्मवर बनलेली ही एसयूव्ही एक नवीन डिझाइन भाषा सादर करेल आणि अधिक प्रीमियम इंटिरियर देईल. भारतात हि गाडी पेट्रोल इंजिनमध्ये येणार आहे.
Skoda Kushaq Facelift
२०२६च्या स्कोडा कुशाकमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आपले आहेत. अपडेटेड वर्जनमध्ये लेवल 2 ADAS (ऑटोनॉमस ड्राइवर असिस्टेंस सिस्टम) आणि पॅनोरामिक सनरूफ मिळेल. यामध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आली आहे.
Tata Sierra EV
टाटा सिएरा २०२६ मध्ये पहिल्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. याचे ओव्हरऑल डिझाईन, इंटिरियर लेआउट आणि फीचर्स फक्त काही EV- फीचर्समधील बदलांव्यतिरिक्त ICE मॉडेलप्रमाणेच असतील. याचे अजून स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत.
Maruti e Vitara
मारुती ई विटारा लाइनअप डेल्टा, जेटा आणि अल्फा या तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. २०२६ च्या सुरुवातीला हि गाडी मार्केटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या गाडीमध्ये दोन बॅटरी 49kWh आणि 61kWh मधून निवड करू शकणार आहेत. या गाडीमध्ये चांगली रेंज मिळणार आहे.

