MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • FASTag गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून 'हे' कटकटीचे काम बंद; टोल नाक्यावर आता गाडी सुसाट धावणार!

FASTag गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून 'हे' कटकटीचे काम बंद; टोल नाक्यावर आता गाडी सुसाट धावणार!

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) खाजगी वाहनांसाठी FASTag घेताना अनिवार्य असलेली KYV प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या या नियमानुसार, आता बँका थेट वाहन डेटाबेसद्वारे गाडीच्या नोंदणीची पडताळणी करतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 29 2026, 03:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
FASTag गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून 'हे' कटकटीचे काम बंद
Image Credit : Asianet News

FASTag गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून 'हे' कटकटीचे काम बंद

टोल नाक्यावरील रांगा टाळण्यासाठी आणि प्रवास वेगवान करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag प्रणालीबाबत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नवीन फास्टॅग घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला 'KYV' (Know Your Vehicle) च्या झंझटीतून कायमची मुक्ती मिळणार आहे. 

26
काय आहे नवा नियम?
Image Credit : Google

काय आहे नवा नियम?

१ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, खाजगी वाहनधारकांसाठी (कार, जीप, व्हॅन) फास्टॅग जारी करताना अनिवार्य असलेली KYV प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेकदा कागदपत्रे देऊनही तांत्रिक कारणांमुळे फास्टॅग सस्पेंड होण्याचे किंवा वारंवार व्हेरिफिकेशन मागण्याचे प्रकार घडत होते. आता या त्रासाला पूर्णविराम मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
खूप रील्स बघता का? गंभीर आजार होऊ शकतात, सावधान!
Related image2
10, 20 रुपयांच्या नोटा आता ATM मध्ये मिळणार.. केंद्र सरकारचा काय आहे सुपर प्लॅन!
36
बँकांकडे सोपवली जबाबदारी
Image Credit : Google

बँकांकडे सोपवली जबाबदारी

आतापर्यंत ग्राहकांना कागदपत्रे अपलोड करावी लागत होती, पण आता ही जबाबदारी बँकांवर असेल.

Vahan डेटाबेसचा वापर: बँका आता थेट सरकारी 'वाहन' (VAHAN) डेटाबेसद्वारे गाडीच्या नोंदणीची पडताळणी करतील.

कमी कागदपत्रे: ग्राहकांना वारंवार आरसी बुक किंवा फोटो देण्याची गरज उरणार नाही.

झटपट अ‍ॅक्टिव्हेशन: सर्व पडताळणी बँक स्तरावरच होणार असल्याने फास्टॅग लवकर सक्रिय होतील. 

46
फक्त 'या' परिस्थितीत होणार तपासणी
Image Credit : Freepik

फक्त 'या' परिस्थितीत होणार तपासणी

लक्षात ठेवा, KYV प्रक्रिया सामान्य प्रवाशांसाठी बंद झाली असली तरी, काही विशेष परिस्थितीत ती पुन्हा विचारली जाऊ शकते.

१. जर फास्टॅग चुकीच्या गाडीवर लावल्याचा संशय आला तर.

२. टॅगचा गैरवापर होत असल्यास.

३. टोल प्लाझावर काही तांत्रिक वाद निर्माण झाल्यास. 

56
जुने यूझर्स आणि कमर्शियल वाहनांचे काय?
Image Credit : Google

जुने यूझर्स आणि कमर्शियल वाहनांचे काय?

जुने यूझर्स: ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जोपर्यंत तुमच्या टॅगमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या येत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन प्रक्रियेची गरज भासणार नाही.

कमर्शियल वाहने: हा दिलासा फक्त खाजगी गाड्यांसाठी आहे. बस, ट्रक आणि अवजड वाहनांसाठी मात्र KYV ची जुनी प्रक्रिया कायम राहणार आहे. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : stockPhoto

महत्त्वाची टीप

तुमचा फास्टॅग नेहमी योग्य मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक ठेवा, जेणेकरून बॅलन्स संपल्यामुळे डबल टोल भरण्याची वेळ येणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
केंद्रीय अर्थसंकल्प

Recommended Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार; कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी गर्जना
Recommended image2
या नक्षत्रात जन्मलेले लोक उद्योग जगताचे सम्राट बनतात!
Recommended image3
सकाळी उठल्यावर पाणी का प्यायला सांगतात? पण ही सवय 'या' लोकांसाठी धोकादायक
Recommended image4
चिकन: शिजवण्यापूर्वी चिकन स्वच्छ धुता ना? मग, ही गोष्ट नक्की जाणून घ्या
Recommended image5
Budget 2026: मोदी सरकारचा युरियाबाबत मोठा निर्णय; आता 'या' भावात शेतकऱ्यांना मिळणार खताची पिशवी
Related Stories
Recommended image1
खूप रील्स बघता का? गंभीर आजार होऊ शकतात, सावधान!
Recommended image2
10, 20 रुपयांच्या नोटा आता ATM मध्ये मिळणार.. केंद्र सरकारचा काय आहे सुपर प्लॅन!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved