MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PhonePe, G Pay की Paytm... लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात माहितीये?

PhonePe, G Pay की Paytm... लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात माहितीये?

सध्या लोक कॅशपेक्षा डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सचाच जास्त वापर करतात. खिशात रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाण आता खूपच कमी झालंय. पण PhonePe, Google Pay आणि Paytm या तिन्हींपैकी लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात हे तुम्हाला माहितीये का?

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 14 2026, 12:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
UPI पेमेंटमध्ये कोणतं अ‍ॅप आहे नंबर वन?
Image Credit : Asianet News

UPI पेमेंटमध्ये कोणतं अ‍ॅप आहे नंबर वन?

आजकाल लोक दुकानात गेले किंवा कोणतीही वस्तू खरेदी केली तरी कॅश देत नाहीत. रस्त्यावर केळी घ्यायची असोत किंवा थेट कार खरेदी करायची असो, लोक मोबाईलवरूनच पेमेंट करतात. पूर्वी मार्केटमध्ये जाताना लोक खिशात नोटांची बंडलं घेऊन जायचे. पण आता सगळेच रिकाम्या खिशाने फिरतात. एखाद्या भिकाऱ्याने दहा रुपये मागितले, तरी द्यायला खिशात सुट्टे पैसे नसतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात?
Image Credit : Twitter

लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात?

लोक भाजीपाला, शॉपिंग आणि लाईट बिलापासून ते प्रत्येक गोष्टीसाठी UPI द्वारेच पेमेंट करतात. मोबाईलवरून डिजिटल पेमेंट करण्यासाठी PhonePe, Google Pay आणि Paytm सारखी अ‍ॅप्स खूप लोकप्रिय आहेत. पण या तिन्हीपैकी लोक सर्वात जास्त काय वापरतात? कोणाचा मार्केट शेअर किती आहे? याची रंजक माहिती आता समोर आली आहे. आकडेवारीनुसार, लोक PhonePe चा सर्वात जास्त वापर करतात. दुसऱ्या नंबरवर Google Pay आणि तिसऱ्या नंबरवर Paytm आहे. PhonePe आणि Google Pay चा एकूण मार्केट शेअर जवळपास 77.9% आहे. तर इतर अ‍ॅप्सचा वाटा या दोन्हींपेक्षा खूपच कमी आहे.

Related Articles

Related image1
WhatsApp Message Scheduling : व्हॉट्सॲपवर आता मेसेज आधीच शेड्युल करता येणार, जबरदस्त फीचर
Related image2
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रोचं उत्पादन ॲपलने 20 टक्क्यांनी घटवलं, भाववाढ भोवली?
35
PhonePe ने मारली बाजी, मार्केट शेअर सर्वाधिक
Image Credit : Asianet News

PhonePe ने मारली बाजी, मार्केट शेअर सर्वाधिक

PhonePe: 45.6% मार्केट शेअरसह पहिल्या नंबरवर.

Google Pay: 32.3% शेअरसह दुसऱ्या नंबरवर.

Paytm: 8% मार्केट शेअरसह तिसऱ्या नंबरवर.

Navi: 4.4% शेअरसह चौथ्या नंबरवर.

Supermoney: याचा मार्केट शेअर 1.7% आहे.

BHIM: 1% मार्केट शेअरसह या यादीत आहे.

FamApp: याचा वाटा 0.9% आहे.

WhatsApp Pay: 0.7% मार्केट शेअर आहे.

CRED: याचा वाटा 0.6% आहे.

Axis Bank App: याचा मार्केट शेअर सुद्धा 0.6% आहे.

45
Paytm तिसऱ्या नंबरवर, आकडेवारीने केलं हैराण
Image Credit : Asianet News

Paytm तिसऱ्या नंबरवर, आकडेवारीने केलं हैराण

UPI पेमेंट अ‍ॅप्सच्या या यादीत Paytm तिसऱ्या नंबरवर आहे. याचा मार्केट शेअर फक्त 8% आहे, तर PhonePe आणि Google Pay या शर्यतीत खूप पुढे आहेत. या दोन अ‍ॅप्सचा एकूण मार्केट शेअर जवळपास 77.9% पर्यंत पोहोचतो. ही आकडेवारी पाहता, UPI अ‍ॅप मार्केटवर या दोन कंपन्यांची मजबूत पकड असल्याचं स्पष्ट होतं.

55
UPI पेमेंटवरील नवीन MDR नियम काय आहे?
Image Credit : Asianet News

UPI पेमेंटवरील नवीन MDR नियम काय आहे?

सध्या UPI ट्रान्झॅक्शनवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याची योजना चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरपासून UPI MDR लागू होणार होता, पण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) निवडक UPI ट्रान्झॅक्शनवरील MDR ची अंमलबजावणी दिवाळीनंतर ढकलली आहे. याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 15 सप्टेंबर रोजी NPCI ने UPI MDR फ्रेमवर्कची घोषणा केली होती. यात ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या निवडक UPI मर्चंट पेमेंटवर 0.4% चार्ज लावण्याचा प्रस्ताव होता, ज्याची कमाल मर्यादा प्रति ट्रान्झॅक्शन ₹300 इतकी आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा
Recommended image2
Tata Motors Festive Offers 2026 : टाटाच्या कार्सवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत
Recommended image3
Toyota Car Offers: टोयोटाच्या गाड्यांवर १३ लाखांपर्यंतची बंपर सूट!
Recommended image4
UPI MDR Charges : यूपीआय युजर्ससाठी मोठी बातमी; MDR शुल्क कधी लागू होणार? वाचा सविस्तर
Recommended image5
Top 5 Smartwatches 2026 : सणासुदीला स्मार्टवॉच घेताय? मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही टॉप ५ घड्याळे पाहा
Related Stories
Recommended image1
WhatsApp Message Scheduling : व्हॉट्सॲपवर आता मेसेज आधीच शेड्युल करता येणार, जबरदस्त फीचर
Recommended image2
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रोचं उत्पादन ॲपलने 20 टक्क्यांनी घटवलं, भाववाढ भोवली?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved