नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास देण्यास सुरुवात केली जाणार आहे. यामुळे वाहनांसाठी प्रत्येक महिन्याला फास्टॅगसाठी रिचार्ज करण्याची अडचण दूर होणार आहे.
मुंबई : येत्या 15 ऑगस्टपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून म्हणजेच NHAI FasTag चा वार्षिक पास सुरू करणार आहे. या नव्या पासमुळे तुमच्या खासगी वाहनांना मोठा फायदा होणार आहे. एवढेच नव्हे या नव्या पासमुळे महामार्गावरुन जाणाऱ्यांना वारंवार फास्टॅगचे सतत रिचार्ज करण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. जाणून घेऊया फास्टॅगच्या वार्षिक पाससाठी कसा ऑनलाइन अर्ज करावा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस...
फास्टॅगचा वार्षिक पास
फास्टॅगचा वार्षिक पास 3 रुपयांचा असून यामध्ये एका वर्षात किंवा 200 टोल क्रॉस करता येणार आहे. जर एका वर्षातच 200 टोल क्रॉस केल्यास आणि पास संपल्यास पुन्हा तो रिन्यू करावा लागेल. हा पास केवळ NHAI आणि रस्ते महामार्ग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस-वे साठीच वापरता येणार आहे.
ऑनलाईन प्रोसेस घ्या जाणून
- यासाठी, प्रथम तुमच्या मोबाईलवर Rajmarg Yatra अॅप डाउनलोड करा.
- तुम्ही NHAI च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
- यानंतर, वाहन क्रमांक म्हणजेच VRN आणि FASTag आयडी टाकून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
- आता तुम्हाला वार्षिक पासचा पर्याय निवडावा लागेल.
- UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पाससाठी ३,००० रुपयांचे पेमेंट पूर्ण करा.
- पेमेंट आणि पडताळणीनंतर, पास तुमच्या विद्यमान FASTag शी लिंक केला जाईल.
- १५ ऑगस्टपासून तुम्हाला पास अॅक्टिव्ह झाल्याचा अलर्ट मिळण्यास सुरुवात होईल.
वार्षिक फास्टॅगचे फायदे
- वार्षिक फास्टॅगमुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
- दररोज प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि रिचार्जच्या प्रोसेसला सतत सामोरे जावे लागणार नाही.
- केवळ रजिस्टर्ड वाहनसाठी वॅलिड आणि नॉन-ट्रांन्सफरेबल असेल.


