EPFO ने सुरु केली नवी सुविधा, PF क्लेम केल्यानंतर लगेच खात्यात जमा होणार पैसे

| Published : Jun 03 2024, 08:16 AM IST

EPFO new Rule
EPFO ने सुरु केली नवी सुविधा, PF क्लेम केल्यानंतर लगेच खात्यात जमा होणार पैसे
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

ईपीएफओच्य नव्या परिपत्रकानुसार क्लेम करण्यासाठी एक नवी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाइन पीएफ क्लेमसाठी पासबुक अथवा चेक कॉपी अपलोड करणे गरजचे नसणार आहे.

EPFO News : कर्मचारी भविष्य निधी संगठनने (EPFO) आपल्या खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने ऑनलाइन पीएफ क्लेमसाठी पासबुक अथवा चेक कॉपी अपलोड करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच खातेधारकाने केलेला क्लेम वेगाने होईल आणि पीएफचे पैसे लवकरच खात्यात ट्रान्सफर केले जातील.

ईपीएफओच्या नव्या परिपत्रकानुसार, क्लेमसाठी नवी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्या ऑनलाइन क्लेममध्ये बँक केवायसीला बँकेकडून ऑनलाइन पद्धतीने वेरिफिकेशन केले आहे आणि कंपनीकडून देखील अन्य कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी केली असल्यास खातेधारकाला चेक अथवा बँकेची पासबुकची कॉपी क्लेमसाठी अपलोड करावी लागणार नाही.

विशिष्ट रंगाचा वापर केला जाणार
खासियत अशी की, क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्यांना वेबसाइटच्या रंगावरुन कळणार की, या प्रकरणात चेक अथवा बँकेचे पासबुकचा फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे की नाही. यासाठी आधीच ऑनलाइन वेरिफाइड खात्याबद्दल समजून घेण्यासाठी त्यांना हिरव्या रंगातील कोड दिला जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना खातेधारकाच्या क्लेमची प्रक्रिया लवकर पूर्ण करणे सोपे होईल. खात्याचे वेरिफिकेशन झाले नाही तर लाल रंगाचा कोड दिला जाईल. यावेळी खातेधारकाकडे पासबुकची कॉपी मागितली जाऊ शकते.

या प्रकरणात मिळते सूट
ईपीएफओ सदस्यांना अशाच प्रकरणात सूट मिळणार आहे जेथे ईपीएफओ सदस्यची दुसऱ्या वेरिफिकेशनसाठीचे कागदपत्र योग्य असतील. यामध्ये संबंधित बँक अथवा एनपीएसआयद्वारे बँक केवायसीचे ऑनलाइन वेरिफिकेशन, डीएससीचा वापर करुन कंपनीद्वारे बँक केवायसी वेरिफिकेशन आणि युएडीआयद्वारे वेरिफिकेशन आधार संख्या अशा काही गोष्टींचा समावेश आहे.

सर्व क्षेत्रांसाठी पाठवण्यात आलेय परिपत्रक
ईपीएफओकडून नव्या क्लेम प्रक्रियेसंदर्भात सर्व क्षेत्रातील कार्यालयांना परिपत्रक पाठवले आहे. ईपीएफओने ईमेलच्या माध्यमातून म्हटले आहे की, बँकेने केवायसीला ऑनलाइन वेरिफिकेशन केले आहे. याशिवाय कंपनीने देखील डिजिटल रुपात स्वाक्षरी केली आहे. असा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून रंगांद्वारे कोडिंग करण्याची सुविधा लवकरच सुरू केली जाईल. तोवर मॅन्युअल पद्धतीने फाइल तपासून पहावी लागणार आहे.

आणखी वाचा : 

घरात किती रक्कम ठेवू शकता? अन्यथा पडाल समस्येत, वाचा Income Tax चा नियम

HDFC बँकेचा मोठा निर्णय, UPI पेमेंटसाठी येणार नाही मेसेज, वाचा संपूर्ण माहिती सविस्तर