EPFO च्या वेबसाइटवर दोन सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे युजर्सला काही सेवांचा लाभ घेता येणार नाहीये. याबद्दलच सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : ईपीएफओच्या वेबसाइटमध्ये अपडेट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पोर्टलमध्ये काही बदल झालेत. अशातच क्लेमची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो असे ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दरम्यान काही सेवांचा लाभ घेताना थोड्या अडचणी येऊ शकतात. अशातच ईपीएफओकडून दोन सुविधा बंद केल्या आहेत.

ईपीएफओच्या दोन्ही सुविधा UAN संदर्भातील आहेत. पोर्टलवर या सुविधा आता बंद केल्या आहेत. केवळ उमंग अॅपच्या माध्यमातून या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामधील पहिली सुविधा UAN अॅक्टिव्हेशन आहे. दुसरी सुविधा अशी की, युजर्सला थेट वेबसाइटवरुन UAN जनरेट करता येणार नाहीये. या दोन्ही सेवा आता उमंग अॅपच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशन (FAT) ची गरज असणार आहे.
अपडेटनंतर हे होणार बदल
- EPFO पोर्टलच्या माध्यमातून UAN अॅक्टिव्हेशन प्रोसेस बंद होणार आहे.
- पोर्टलवर थेट UAN जनरेट करता येणार नाहीये.
- दोन्ही सेवा UMANG अॅपच्या मदतीनेच पूर्ण होणार.
- UAN अॅक्टिव्हेट करण्यासाठी आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशनची गरज भासणार.
UAN कसे अॅक्टिव्हेट करू शकतो?
युजर्सला ईपीएफओच्या पोर्टलच्या माध्यमातून UAN नंबर अॅक्टिव्हेट करता येणार नाहीये. त्याऐवजी उमंग अॅपचा वापर करावा लागणार आहे.
उमंग अॅपवर असे करा अॅक्टिव्हेट
- गुगल प्ले किंवा अॅप्पल अॅप स्टोअरवर उमंग अॅप डाउनलोड करा
- ईपीएफओ सेवा सुरू करा
- फेसच्या माध्यमातून UAN सर्विसमध्ये युएएन अॅक्टिव्हेशनचा पर्याय निवडा
- ऑथेंटिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. स्क्रिनवरील सूचनांचे पालन करुन प्रोसेस पूर्ण करा.

