सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर एक अशी योजना आहे ज्यात सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला व्याजदरही मिळतो आहे. सरकारच्या या योजनेमुळे टॅक्समध्ये सूटही मिळते. 

मुंबई : सुरक्षित भविष्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. अशीच एक सरकारची योजना आहे ज्यात सुरक्षित गुंतवणूक करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर चांगला व्याजदरही मिळतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सरकारची सुरक्षित योजना

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC योजना गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेत केवळ सुरक्षाच नाही, तर रिटर्न्सदेखील चांगले आहेत. फायद्याची आणखी एक गोष्ट म्हणजे ही योजना शेअर मार्केटच्या रिस्कपासूनही वाचवते. १००० रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी यात योजनेत कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेत टॅक्सचाही फायदा मिळतो. ओल्ड टॅक्स रिजीमनुसार या NSC मध्ये १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८० c अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. या योजनेअंतर्गत पहिल्या चार वर्षात मिळालेल्या व्याजावर कोणताही टॅक्स बसत नाही. मात्र पाचव्या वर्षी मॅच्युरिटी अमाऊंट अर्थात मॅच्युरिटीच्या रकमेवर टॅक्स आकारला जातो.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत ७.७ टक्के इतका व्याजदर मिळतो. वर्षाला हा व्याजदर चक्रवाढ व्याजाने वाढत जातो. म्हणजेच व्याजामुळे वाढलेल्या रकमेवरही पुन्हा ७.७ टक्के इतका व्याजदर लागतो. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

एखाद्या गुंतवणुकदाराने पाच वर्ष या योजनेत ५ लाखांची गुंतवणू केली, तर NSC स्किमच्या मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला ७,२४,५१७ रुपये मिळतील. यातील २,२४,५१७ रुपये केवळ मुद्दल रकमेवर मिळालेला व्याजदर असेल.