रोजच्या नाश्त्याला काहीतरी नवीन ट्राय करायचंय? मग कोरियाची प्रसिद्ध डिश 'तेओकबोकी' (Tteokbokki) नक्की करून बघा. ही एक मसालेदार, चविष्ट आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, जी तुम्ही नाश्ता किंवा स्नॅक म्हणून खाऊ शकता.

Korean Food Recipes India: आपण सहसा सकाळी नाश्त्याला पराठे किंवा सँडविच बनवतो, पण काही दिवसांनी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. आपलं मन काहीतरी नवीन खाण्यासाठी उत्सुक असतं. जर तुम्ही रोजचे पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन, चविष्ट आणि हटके ट्राय करू इच्छित असाल, तर कोरियाची प्रसिद्ध डिश 'तेओकबोकी' (Tteok-Bokki) तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. ही डिश केवळ चवीलाच भारी नाही, तर बनवायलाही खूप सोपी आहे. विशेष म्हणजे, तुम्ही ही डिश नाश्त्यात, स्नॅक म्हणून किंवा अगदी हलक्या जेवणातही खाऊ शकता. आजकाल कोरियन पदार्थांचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि 'तेओकबोकी' ही त्यापैकीच एक लोकप्रिय डिश आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तेओकबोकी बनवण्याची पद्धत

साहित्य

  • राइस केक - 1 कप
  • पाणी - 2 कप
  • पातीचा कांदा (Scallions) - 2 मोठे चमचे
  • साखर - 1 मोठा चमचा
  • गोचुजांग (Gochujang - कोरियन चिली पेस्ट) - 2 मोठे चमचे
  • सोया सॉस - 1 मोठा चमचा
  • लसूण (बारीक चिरलेला) - 1 मोठा चमचा
  • तिळाचं तेल (Sesame Oil) - 1 मोठा चमचा
  • उकडलेली अंडी (ऐच्छिक)
  • चीज (ऐच्छिक)
  • सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी गरम करा. नंतर त्यात गोचुजांग, सोया सॉस, साखर आणि लसूण घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
  • जेव्हा सॉस उकळू लागेल, तेव्हा पॅनमध्ये राइस केक टाका. मध्यम आचेवर सुमारे 10 मिनिटे शिजवा किंवा सॉस घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
  • शेवटी, वरून तिळाचं तेल घाला आणि पातीचा कांदा टाका. जर तुम्हाला चव आणखी वाढवायची असेल, तर तुम्ही त्यात उकडलेली अंडी किंवा चीजही घालू शकता.