MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Emergency Fund : 6 महिन्यांचा खर्च कसा विभागून साठवायचा? महागाईला मात देण्यासाठी इमर्जन्सी फंड फॉर्म्युला!

Emergency Fund : 6 महिन्यांचा खर्च कसा विभागून साठवायचा? महागाईला मात देण्यासाठी इमर्जन्सी फंड फॉर्म्युला!

अचानक येणारा वैद्यकीय खर्च किंवा नोकरी जाण्यासारख्या संकटात आधार देण्यासाठी ६ महिन्यांच्या खर्चासाठी इमर्जन्सी फंड ३ टप्प्यांत विभागून साठवला, तर सुरक्षा आणि परतावा दोन्ही मिळतं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 21 2026, 03:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
इमर्जन्सी फंड सेव्हिंग प्लॅन
Image Credit : Asianet News

इमर्जन्सी फंड सेव्हिंग प्लॅन

अचानक येणारा वैद्यकीय खर्च किंवा नोकरी जाण्यासारख्या कठीण प्रसंगात इमर्जन्सी फंड ढाल बनून साथ देतो. ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम साठवणं गरजेचं असतं, पण सगळेच पैसे साध्या बचत खात्यात ठेवले तर फक्त ३% व्याज मिळेल; दुसरीकडे जवळपास ६% महागाईमुळे (वाढत्या किंमतींमुळे) पैशाचं मूल्य कमी होईल. शेअर बाजारात गुंतवणूक केली, तर गरजेच्या वेळी लगेच पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे, सुरक्षा आणि परतावा दोन्ही मिळवण्यासाठी ६ महिन्यांचा इमर्जन्सी फंड ३ स्तरांमध्ये विभागता येतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पहिली स्टेप (१७% – एका महिन्याचा खर्च)
Image Credit : Getty

पहिली स्टेप (१७% – एका महिन्याचा खर्च)

एकूण इमर्जन्सी फंडातील १७% रक्कम, चांगलं व्याज देणाऱ्या स्वतंत्र बचत खात्यात (High-yield Savings Account) ठेवली पाहिजे. हे रोजच्या खर्चाच्या खात्याला जोडू नये. अचानक उद्भवणारी वैद्यकीय गरज किंवा तातडीच्या प्रवासावेळी यूपीआय (UPI) किंवा एटीएम (ATM) द्वारे लगेच पैसे काढायला याची मदत होईल.

Related Articles

Related image1
PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
Related image2
Saving Scheme : महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक मिळवून देईल २५ लाख रुपये, कसं? ही सरकारी योजना कोणती?
34
दुसरी स्टेप (३३% – २ महिन्यांचा खर्च)
Image Credit : PR

दुसरी स्टेप (३३% – २ महिन्यांचा खर्च)

बचतीतील ३३% रक्कम 'ऑटो-स्वीप एफडी' (Auto-swipe FD) सुविधा असलेल्या खात्यात ठेवू शकता. हे बचत खात्याशी जोडलेलं असतं. जोपर्यंत पैसे खात्यात आहेत, तोपर्यंत एफडीचं व्याज मिळेल; पहिल्या स्टेपचे पैसे अपुरे पडल्यास डेबिट कार्ड किंवा चेकने पैसे काढताना जेवढी रक्कम हवी, तेवढीच आपोआप मोडून बाहेर येईल.

44
तिसरी स्टेप (५०% – ३ महिन्यांचा खर्च)
Image Credit : PR

तिसरी स्टेप (५०% – ३ महिन्यांचा खर्च)

उर्वरित ५०% रक्कम 'लिक्विड म्युच्युअल फंड्स' (Liquid Mutual Funds) मध्ये गुंतवू शकता. सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक होत असल्याने व्याजाचं उत्पन्न मिळतं; 'इन्स्टा-रिडेम्प्शन' (Insta-Redemption) सुविधेमुळे अवघ्या ३० मिनिटांत ५०,००० रुपयांपर्यंत रक्कम लगेच काढताही येते. नोकरी जाण्यासारख्या परिस्थितीत पैसे उभे करायला जवळपास २४ तासांचा वेळ असतो, तेव्हा हे उपयुक्त ठरतं.

लक्षात ठेवण्यासारखे ३ महत्त्वाचे नियम:

इमर्जन्सी फंड रोजच्या खर्चाच्या खात्यापेक्षा वेगळा ठेवला पाहिजे.

दरवर्षी महागाईच्या वाढीनुसार मासिक खर्चाचा अंदाज घेऊन, तिन्ही स्टेप्समधील रक्कम वाढवली पाहिजे.

सुट्टीच्या दिवशीही लिक्विड फंडातून लगेच पैसे काढण्यासाठी, संबंधित म्युच्युअल फंड कंपनीच्या (AMC) थेट ॲप किंवा वेबसाइटचा वापर करता येतो.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Huawei Watch Air : 7 दिवसांची बॅटरी, 6.9 मिमी जाडी आणि फक्त 27 ग्रॅम वजन! बाजारात धुमाकूळ घालायला येतेय हुआवे वॉच एअर
Recommended image2
'GTA 6' ने रचला इतिहास, पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Recommended image3
Volkswagen Tengo: टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाला भिडणार फोक्सवॅगनची नवी एसयूव्ही 'टेंगो'
Recommended image4
Health Issues: काळानुसार माणसांचं आरोग्य बिघडतंय.. कसं आणि का?
Recommended image5
Multiple Savings Accounts: तुमच्याकडे किती सेव्हिंग्स अकाउंट असावेत आणि कोणत्या बँकेत?
Related Stories
Recommended image1
PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
Recommended image2
Saving Scheme : महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक मिळवून देईल २५ लाख रुपये, कसं? ही सरकारी योजना कोणती?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved