सार
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात आहे. अशातच सध्या कॉल मर्जिंगचा एक नवा मार्ग फसवणूकीसाठी समोर आला आहे. याला बळी पडल्यास तुमची खासगी माहिती ते डिजिटल अकाउंट्सवर हल्ला होऊ शकतो.
Call Merging Scam : सध्याच्या बदलत्या आणि मॉर्डन युगात बहुतांश गोष्टी डिजिटली होत आहेत. अशातच सायबर हल्लेखोर नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेळोवेळी नवे मार्ग शोधून काढत आहेत. अलीकडेच कॉल मर्जिंग नावाच्या फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये फसवणूकदार व्यक्ती पीडित व्यक्तीच्या WhatsApp Call, Gmail, बँक खाते आणि अन्य डिजिटल डेटापर्यंत पोहोचला जातोय. खासकरुन अशाप्रकारची फसणूक डॉक्टर्स, व्यवसायिक आणि उच्च पदावरील अधिकाऱ्यांसोबत केली जात आहे.
अशी होतो फसवणूक
कॉल मर्जिंगच्या फसवणूकीमध्ये सुरुवातीला एखाद्या ओखळीच्या व्यक्तीच्या आवाजात फोन केला जातो. यानंतर एखाद्या कारणास्तव पीडित व्यक्तीला फोन कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते. जसे की, व्हेरिफिकेशनची प्रोसस असल्याचे भासवले जाते. यानंतर कॉल मर्ज झाल्यानंतर फसवणूकदार ओटीपी मिळवू शकतो. ओटीपी ऐकल्यानंतर पीडित व्यक्तीचे खाते, ईमेल, फोटो, बँक खात्याची माहिती, ठिकाण अशा काही गोष्टींपर्यंत पोहोचला जातो. व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या प्रकरणात, टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची प्रक्रिया मोडून पीडित व्यक्तीला त्यामधून वगळले जाते. यानंतर पीडित व्यक्तीची फसवणूकदार कोणत्याही प्रकारे फसवणूक करू शकतो.
असे रहा दूर
कॉल मर्जिंगपासून दूर रहा
एखाद्याने कॉल मर्ज करण्यास सांगितल्यास लगेच सतर्क व्हा. कोणत्याही अज्ञात क्रमांकावरुन आलेल्या फोनवर विश्वास ठेवू नका.
ओटीपी शेअर करू नका
फोनवरील व्यक्ती तुम्हाला स्वत: बँक अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी सांगून ओटीपी मागत असल्यास अशी चूक करणे टाळा.
वॉइसमेल सुरक्षित करा
फसवणूकदार वॉइसमेल पाठवून ओटीपी मिळवू शकतो. यामुळे स्ट्रॉन्ग वॉइसमेल पिन सेट करा.
कॉल व्हेरिफिकेशन
एखादा अज्ञात व्यक्ती काही वेगळ्या गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलत असेल किंवा सांगण्यास सांगत असल्यास फोन बंद करा. यावेळी कॉल व्हेरिफिकेशन करा.
बँकिंग आणि युपीआय ट्रांजेक्शन
आर्थिक फसणूकीपासून दूर राहण्यासाठी युपीआय आणि बँक अकाउंट ट्रांजेक्शनची मर्यादा सेट करा.
फसवणूक झाल्यास काय कराल?
- सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 यावर फोन करा आणि घटनेचा रिपोर्ट करा.
- बँकेला माहिती द्या किंवा कळवा.
- व्हॉट्सअॅप आणि जीमेलच्या रिकव्हरीसाठी प्रोसेस लगेच सुरू करा आणि आपले अकाउंट सुरक्षित करा.