सार

Ayushman Card : पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. पण या योजनेचे लाभार्थी असून त्याचे कार्ड हरवल्यास उपचार घेऊ शकतो का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Ayushman Card : सध्याच्या काळात प्रत्येकजण आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. जेणेकरुन भविष्यात एखादा आजार झाल्यास त्यासाठी आधीच हेल्थ इन्शुरन्स काढला जातो. हा इन्शुरन्स प्रत्येकजण आपल्याला परवडेल त्या किंमतीत काढतो. अशातच सरकारने खासकरुन आर्थिक रुपात असक्षम असणाऱ्या वर्गासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.

पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. यासाठी आयुष्मान कार्ड तयार करावे लागतो. अशातच आयुष्मान कार्ड तयार केल्यानंतर हरवल्यास आणि उपचार घ्यायचे असतील तर मोफत होऊ शकतात का याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

आयुष्मान कार्डच्या मदतीने उपचार

  • तुमचे आयुष्मान कार्ड हरवले असल्यास टेन्शन घेऊ नका. तुम्ही कार्डशिवायही मोफत उपचार घेऊ शकता. यासाठी आयुष्मान मित्र हेल्प डेस्कला जाऊन भेटा. येथे आयुष्मान योजनेअंतर्गत नियमांबद्दल सांगितले जाईल. याशिवाय कार्ड हरवल्याची तक्रारही करता येईल.
  • यावेळी आयुष्मान मित्र डेक्सवरील व्यक्तीला तुमचा मोबाईल क्रमांक सांगा, जो आयुष्मान कार्डला लिंक आहे.
  • तुमच्या क्रमांकाच्या मदतीने तुमची ओखळ पडताळणी केली जाईल.यानंतर मोफत उपचार घेऊ शकता.

रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्यास तर?

  • आयुष्मान कार्ड हरवल्यानंतर रुग्णालयाने मोफत उपचार करण्यास नकार दिल्यास त्यांची तक्रार करू शकता.
  • हेल्पलाइन क्रमांक 14555 वर संपर्क साधून येथे तक्रार करा.
  • पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरही तक्रार दाखल करू शकता.