- Home
- Utility News
- Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयात ८३ जागांसाठी मेगा भरती! ₹४६,००० पगार आणि अर्ज शुल्कही नाही; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयात ८३ जागांसाठी मेगा भरती! ₹४६,००० पगार आणि अर्ज शुल्कही नाही; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाने आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी सिस्टिम ऑफिसर, सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी ८३ जागांची भरती जाहीर केली. या पदांसाठी नोकरीची संधी मिळत असून, विशेष म्हणजे यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयात ८३ जागांसाठी मेगा भरती! ₹४६,००० पगार आणि अर्ज शुल्कही नाही
मुंबई : नवीन वर्षात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने आनंदाची बातमी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
रिक्त पदांचा तपशील
मुंबई उच्च न्यायालयाने एकूण ८३ जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सिस्टिम ऑफिसर (System Officer): ५४ पदे
सिनियर सिस्टिम ऑफिसर (Senior System Officer): २९ पदे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
दोन्ही पदांसाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
शिक्षण: B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) किंवा MCA पदवी.
अतिरिक्त प्रमाणपत्रे: नेटवर्क प्रमाणपत्र (MCSE / RHCE) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (Red Hat Enterprise Linux) चे ज्ञान.
अनुभव: सिस्टिम ऑफिसरसाठी: किमान ०१ वर्षाचा अनुभव.
सिनियर सिस्टिम ऑफिसरसाठी: किमान ०५ वर्षांचा अनुभव.
पगार आणि वयोमर्यादा
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ४०,००० ते ४६,००० रुपयांपर्यंत आकर्षक मानधन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा: २९ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सवलत: SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ०५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्जाची महत्त्वाची तारीख आणि लिंक्स
या पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्जाची शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२६ (संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: https://drive.google.com/file/d/1oBz796nWklreXGRcaQMef9a49xYBmXak/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: https://bhc.gov.in/bhcsysadmin/
महत्त्वाची टीप
नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी विनामूल्य आहे, त्यामुळे पात्रता असणाऱ्या तरुणांनी ही सुवर्णसंधी सोडू नये.

