Bike Market: Hero ची नवी बाईक इथेनॉलवर धावणार, किंम ₹72,792 पासून सुरू!
Bike Market: Hero च्या नव्या फ्लेक्स-फ्युएल बाईक्सची किंमत ₹72,792 पासून सुरू होते. पण या बाईक्स इतक्या महत्त्वाच्या का आहेत? कारण, यात भारतीय ऑटो क्षेत्राचं भविष्य बदलण्याची ताकद आहे.
15

Image Credit : Instagram
भारतातील पहिली फ्लेक्स-फ्युएल बाईक
हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) भारतीय दुचाकी बाजारात एक नवा अध्याय सुरू केला आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या चर्चेत आता कंपनीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. हिरोने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्युएल (Flex-Fuel) टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या मोटरसायकल अधिकृतरित्या लाँच केल्या आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Instagram
फ्लेक्स-फ्युएल बाईकची किंमत
या नव्या रेंजमध्ये हिरो स्प्लेंडर प्लस फ्लेक्स-फ्युएल (Hero Splendor Plus Flex-Fuel) आणि हिरो एचएफ डिलक्स फ्लेक्स-फ्युएल (Hero HF Deluxe Flex-Fuel) या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाड्या लाँच करण्यात आल्या. या बाईक्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹82,710 आणि ₹72,792 आहे. पहिल्या टप्प्यात या बाईक्स दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.
35
Image Credit : Instagram
हिरो फ्लेक्स-फ्युएल बाईकची वैशिष्ट्ये
या दोन्ही मोटरसायकलमध्ये 97.2 सीसी क्षमतेचं सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या बाईक्स 20 टक्के ते 85 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. यासाठी इंजिन कंट्रोल युनिट (ECU) आणि फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
45
Image Credit : Instagram
हिरो एचएफ डिलक्स नवीन मॉडेल
आतापर्यंत फ्लेक्स-फ्युएल टेक्नॉलॉजी फक्त महागड्या आणि प्रीमियम मोटरसायकलमध्येच उपलब्ध होती. पण हिरोने ही टेक्नॉलॉजी स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्ससारख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील बाईक्समध्ये आणली आहे. यामुळे पर्यायी इंधनाचा वापर लोकांमध्ये वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे.
55
Image Credit : Instagram
इथेनॉल इंधनावर चालणारी बाईक
केंद्र सरकार इंधन आयातीचा खर्च कमी करण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायी इंधनाच्या वापराला सतत प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे, हिरोचं हे लाँचिंग फक्त एका नवीन बाईकचं लाँचिंग नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या भविष्याची दिशा दाखवणारी एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

