लेटलतीफी टाळा! क्रेडिट कार्ड किंवा कर्जाची हफ्ते वेळेवर न भरल्यास स्कोअर कमी होतो. Auto-Pay सेट करा म्हणजे तुम्ही पेमेंट विसरणार नाही.
क्रेडिट लिमिटच्या ३०% पेक्षा कमी खर्च करा. जर तुमची लिमिट ₹1,00,000 असेल, तर ₹30,000 पेक्षा जास्त खर्च करू नका.
अनेक वेळा कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास Hard Inquiry होते आणि स्कोअर कमी होतो. फक्त आवश्यक असेल तेव्हाच अर्ज करा.
जुन्या आणि वेळेवर भरलेल्या क्रेडिट कार्ड्स Credit History सुधारतात. जुनी क्रेडिट हिस्ट्री असेल तर तुमचा स्कोअर जास्त मजबूत होतो.
फक्त क्रेडिट कार्ड न वापरता Home Loan, Car Loan, Personal Loan यांचा चांगला व्यवहार ठेवा. यामुळे तुम्हाला फिनान्स मॅनेजमेंट चांगले जमत असल्याचे दिसून येते.