- Home
- Utility News
- पनवेलकरांसाठी मोठं गिफ्ट! आता 'अमृत भारत एक्सप्रेस'ने गाठता येणार उत्तर-पूर्व भारत; पाहा नवा मार्ग आणि खास वैशिष्ट्ये
पनवेलकरांसाठी मोठं गिफ्ट! आता 'अमृत भारत एक्सप्रेस'ने गाठता येणार उत्तर-पूर्व भारत; पाहा नवा मार्ग आणि खास वैशिष्ट्ये
Amrit Bharat Express Train Features : भारतीय रेल्वेने पनवेल ते अलीपुरद्वार (पश्चिम बंगाल) दरम्यान नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई, पनवेल आणि रायगडमधील प्रवाशांना थेट उत्तर-पूर्व भारताशी जोडले जाईल.

मुंबईकरांची चंगळ! आता पनवेलहून सुटणार 'अमृत भारत एक्सप्रेस'
मुंबई : मुंबईच्या रेल्वे प्रवाशांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात कनेक्टिव्हिटीचे जाळे विस्तारण्यासाठी ९ नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' गाड्यांची घोषणा केली असून, यामध्ये मुंबईला मोठे 'गिफ्ट' मिळाले आहे. या नव्या निर्णयानुसार, आता एक विशेष अमृत भारत एक्सप्रेस थेट पनवेल ते अलीपुरद्वार (पश्चिम बंगाल) दरम्यान धावणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून कौतुक, रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ९ नवीन मार्गांची अधिकृत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे या उपक्रमाचे स्वागत केले असून, "या गाड्यांमुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर व्यापार आणि पर्यटनालाही नवी गती मिळेल," असा विश्वास व्यक्त केला आहे.
पनवेल स्थानक होणार 'कनेक्टिव्हिटी हब'
आतापर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मुंबई गाठावी लागत होती, मात्र आता पनवेल हे महत्त्वाचे जंक्शन म्हणून समोर येत आहे.
फायदा कुणाला? नवी मुंबई, पनवेल आणि रायगडमधील प्रवाशांना आता थेट उत्तर-पूर्व भारताशी जोडले जाता येईल.
कोकण रेल्वेला जोड: या गाडीमुळे कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही जलद प्रवासाचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
काय आहे 'अमृत भारत' एक्सप्रेसची वैशिष्ट्ये?
सर्वसामान्यांची 'वंदे भारत' म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे.
पुश-पुल तंत्रज्ञान: ट्रेनच्या दोन्ही बाजूला इंजिन असल्याने वेग पकडणे आणि कमी करणे अत्यंत सोपे होते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो.
आरामदायी प्रवास: कमी तिकीट दरात प्रवाशांना आरामदायी सीट्स, आधुनिक स्वच्छतागृहे आणि प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉईंट्स मिळतात.
सुरक्षा: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ट्रेनमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
डिझाइन: आकर्षक इंटिरिअर आणि झटकेमुक्त प्रवासासाठी प्रगत कपलर तंत्रज्ञानाचा वापर.
देशातील इतर ८ महत्त्वाचे मार्ग कोणते?
मुंबईसह खालील शहरांनाही 'अमृत भारत'ची भेट मिळाली आहे.
कामाख्या (गुवाहाटी) - रोहतक
डिब्रूगड - लखनऊ (गोमती नगर)
जलपाईगुडी - तिरुचिरापल्ली
न्यू जलपाईगुडी - नागेरकोईल
अलीपुरद्वार - SMVT बेंगळुरू
संतरागाच्छी - तामबरम
हावडा - आनंद विहार (दिल्ली)
सियालदाह - बनारस
प्रवाशांचा दर्जा सुधारणार!
"प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेने हे एक क्रांतीकारक पाऊल आहे," असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे. लवकरच या गाड्यांना प्रत्यक्ष हिरवा कंदील दाखवला जाणार असून, यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा दर्जा एका वेगळ्या उंचीवर पोहोचणार आहे.

