Marathi

केस गुंतणार नाहीत, अडकणार नाहीत, होळीसाठी बनवा ५ झटपट बन हेअरस्टाईल्स

Bun Hairstyles होळीत रंग खेळताना केस मोकळे ठेवले की ते गुंततात आणि खराब होतात. अशावेळी केसांचा बन बांधणं हा एक उत्तम पर्याय आहे.

Marathi

बन हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

होळीत तुमचे केस सुरक्षित राहावेत आणि तुमचा लूकही स्टायलिश दिसावा असं वाटत असेल, तर या ५ बन हेअरस्टाईल्स तुमच्यासाठीच आहेत. चला पाहूया.

Image credits: google gemini
Marathi

मेसी बन हेअरस्टाईल

होळीच्या उत्साही वातावरणाला मॅच करण्यासाठी तुम्ही अशी सिंपल मेसी बन हेअरस्टाईल करू शकता. यामध्ये उंच बनला थोडं विस्कटलेल्या स्टाईलमध्ये बांधा आणि केसांच्या काही बटा बाहेर काढा.

Image credits: gemini
Marathi

पर्ल बन हेअरस्टाईल

केसांना पारंपरिक किंवा एथनिक लूक द्यायचा असेल, तर ही पर्ल बन हेअरस्टाईल ट्राय करा. मोत्यांच्या माळेसोबत वेणी घालून मग तिचा बन करा. यामुळे एकदम स्मूद आणि आकर्षक लूक मिळेल.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल ॲक्सेसरीज लो बन

सर्वात आधी एक साधा लो बन बांधा आणि त्यावर फुलांची ॲक्सेसरी लावा. केसांच्या कडेने आणि कपाळावर थोडं तेल लावा, म्हणजे रंग त्वचेला आणि केसांना कमी चिकटेल.

Image credits: pinterest
Marathi

ट्विस्टेड फ्रेंच बन हेअरस्टाईल

केसांचे दोन भाग करा आणि दोन्ही बाजूंनी लहान बटा घेऊन त्यांना पीळ देत हा ट्विस्टेड फ्रेंच बन बांधा. हा बन पिना लावून घट्ट करा. यामुळे केस पूर्णपणे जागेवर राहतील.

Image credits: pinterest
Marathi

हाय टाईट बन

सगळे केस वर घेऊन घट्ट बन बांधा. एक मजबूत रबर बँड आणि बॉबी पिन्स वापरा. वरून थोडा हेअर स्प्रे करा. तुम्ही हवं असल्यास याला मिनी ब्रेड्ससोबतही (लहान वेण्या) बनवू शकता.

Image credits: pinterest

Silver Anklet: काळ्या मण्यांच्या डबल लेयर सिल्व्हर अँकलेट, पाहा 7 लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाइन्स

Stone Toe Rings: स्टोन वर्क असलेल्या चांदीच्या जोडव्यांच्या सुंदर डिझाइन्स, पैंजणांशिवाय पायांना द्या खास लुक

Marwadi Earrings: लेकीला पगफेऱ्यात द्या मारवाडी कानातले, 5 ग्रॅममध्ये पाहा सुंदर डिझाइन्स

Micro Earrings: चिमुकलीसाठी खास गोल्ड स्टड्स, १८ वर्षांनंतरही दिसेल स्टायलिश!